अरे हा उंदीर आहे की माणूस? भरपावसात स्टाईलमध्ये करतोय आंघोळ

Raat Bathing in Rain Viral Video: एखादा माणूस आंघोळ करताना ज्याप्रमाणे चेहरा धुवतो,तसाच हा उंदीर करताना दिसतोय. तुम्ही याबद्दल फक्त ऐकलं असतं तर कदाचित यावर विश्वास ठेवला नसता. पण व्हिडीओच समोर आल्याने आता लोक अचंबित झाले आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 6, 2023, 08:36 PM IST
अरे हा उंदीर आहे की माणूस? भरपावसात स्टाईलमध्ये करतोय आंघोळ  title=

Raat Bathing in Rain Viral Video: पाऊस पडल्यानंतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतात. यामध्ये कोणी पावसात भिजतोय, फिरतोय, पडतोय तर कोणी खाण्याचा आनंद घेतोय. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये एक उंदीर चक्क पावसात आंघोळ करतोय. एखादा माणूस आंघोळ करताना ज्याप्रमाणे चेहरा धुवतो,तसाच हा उंदीर करताना दिसतोय. तुम्ही याबद्दल फक्त ऐकलं असतं तर कदाचित यावर विश्वास ठेवला नसता. पण व्हिडीओच समोर आल्याने आता लोक अचंबित झाले आहेत. 

भरपावसात माणसांप्रमाणे उंदीर अंघोळ करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक छोटा उंदीर पावसात भिजण्याचा आनंद तर घेत आहेच, पण यासोबत माणसांप्रमाणे अंग घासून आंघोळ करतानाही दिसत आहे. 

उंदराच्या अंघोळीची स्टाईल इतकी अप्रतिम आहे की लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. उंदराच्या आंघोळीचा हा व्हिडीओ ट्विटरवर @TheFigen_ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला 737k हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. उंदराला स्वच्छता आवडते, असे एका यूजरने लिहिले आहे. कुणीतरी साबण द्या, असे दुसऱ्या युजरने लिहिले आहे.