तुम्हाला माहितीये का; Ratan Tata इन्टाग्रामवर फक्त एकाच युझरला फॉलो करतात, कोण आहे तो Instagram User?

Ratan Tata: रतन टाटा यांना आपल्यापैंकी सगळेच फॉलो करतात. त्यांचे इन्टाग्रामवर 8.5 मिलियन म्हणजे 85 लाख फॉलोवर्स (Ratan Tata Instgram Followers) आहेत. परंतु तुम्ही कधी हे पाहिलं आहे का की इतके फॉलोवर्स असूनही रतन टाटा मात्र एकाच युझरला फॉलो करतात. पाहा कोण आहे तो युझर (User) ? 

Updated: Mar 10, 2023, 10:43 AM IST
तुम्हाला माहितीये का; Ratan Tata इन्टाग्रामवर फक्त एकाच युझरला फॉलो करतात, कोण आहे तो Instagram User?  title=
Ratan Tata follows only one Instagram profile know who is

Ratan Tata Instagram: उद्योगपती रतन टाटा यांना तुम्हीही इन्टाग्रामवर फॉलो करत असालच. रतन टाटा हे भारतातील सर्वात मोठे आणि नामवंत उद्योगपती (Industrialist Rata Tata) आहे. त्यांच्या टाटा समूहाच्या (Tata Group)  विस्ताराची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जमशेदजी टाटा (Jameshji Tata) यांच्यापासून सुरूवात होत त्याच्या पुढच्या पिढीनं त्यांच्या हा समूह जगात नेला आणि प्रत्येक भारतीयांसाठी तो अभिमानाचा क्षण ठरला. रतन टाटा हे आजही आपल्या विचारानं आणि कर्तृत्वानं चांगळ्यांनाच प्रेरणा देत असतात. सोशल मीडियावरही रतन टाटा (Ratan Tata on Social Media) हे सक्रिय आहेत.

त्यांचे इन्टाग्रामवर 8.5 लाख फॉलोवर्स आहेत. आपल्या आयुष्यातील अनेक आठवणी ते इन्टाग्रामवर शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंनाही प्रचंड लाईक्स येतात आणि त्यांचे फोटोजही व्हायरल होत असतात. परंतु तुम्हाला माहितीये का की 8.5 लाख फॉलोवर्स असलेले रतन टाटा हे इन्टाग्रामवर फक्त एकच व्यक्तीला फॉलो (Ratan Tata Follows 1 User on Instagram) करतात तुम्हाला माहितीये का ती व्यक्ती कोण आहे? (Ratan Tata follows only one Instagram profile know who is)

85 वर्षाय रतन टाटा यांचे 8.5 फॉलोवर्स हे इन्टाग्रामवर आहेत. परंतु ते फक्त एकाच इन्टाग्राम युझरला फॉलो करतात पहा ते कोण आहेत? रतन टाटा हे टाटा ट्रस्ट (Tata Trust) या चॅरिटेबल संस्थेला फॉलो करतात. ही संस्था 1919 साली स्थापन झाली होती. ही संस्था शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती अशा विविध पातळीवर काम करते. शाश्वत विकास आणि पर्यावरण हा क्षेत्रात विकास आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा आधार या संस्थेद्वारे घेतला जातो, असं डिस्क्रिपशन टाटा ट्रस्टच्या प्रोफाईलवर आहे. 

रतन टाटांनी तीन वर्षांपुर्वी आपल्या इन्टाग्राम प्रवासाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांच्या फॉलोवर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांच्या फोटोंचीही अनेकदा चर्चा होत असते. ते कधी आपल्या लहानपणीचे फोटो शेअर (Ratan Tata Younger Photos on Instagram) करताना दिसतात तर कधी त्यांच्या तरूण वयातील. त्यांच्या आयुष्यातील एचिव्हमेंट्सबद्दलही ते इन्टाग्रानवर फोटोज शेअर करताना दिसतात. आपल्या चाहत्यांसोबत काही आठवणी, काही हळव्या गोष्टीही शेअर करतात. कधी काही संदेश असेल तर तोही शेअर करतात.

त्यांच्या तरूणवयातील एक फोटो खूप जास्त व्हायरल झाला होता. ज्याला 10 लाखाहून अधिक लाईक्स आले होते. मध्यतंंरी त्यांना त्यांच्या भावासोबतचाही एक फोटो शेअर केला होता ज्यालाही तूफान लाईक्स आले होते. त्यांच्या फोटोंना दहा लाखांच्या वर तर हमखास लाईक्स येतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रतन टाटा यांनी टाटा समूहाचा विस्तार केला. आज प्रत्येक भारतीयांसाठी रतन टाटा हे प्रेरणास्त्रोत ठरले आहेत.