पूरग्रस्तांना मदत करतांना रत्नागिरीचा जवान शहीद

अरुणाचल प्रदेशमधील पूरग्रस्तांना मदत करताना वायुदलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील फ्लाईट इंजीनिअर राजेंद्र गुजर बेपत्ता झाले होते. शनिवारी त्यांचा मृतदेह सापडला. राजेंद्र गुजर हे मंडणगड तालुक्यातील पालवणी-जांभुळनगर इथले रहिवासी आहेत. त्यांचं पार्थिव आज त्यांच्या गावी आणण्यात येईल. तिथे त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Updated: Jul 10, 2017, 01:16 PM IST
पूरग्रस्तांना मदत करतांना रत्नागिरीचा जवान शहीद title=

इटानगर : अरुणाचल प्रदेशमधील पूरग्रस्तांना मदत करताना वायुदलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील फ्लाईट इंजीनिअर राजेंद्र गुजर बेपत्ता झाले होते. शनिवारी त्यांचा मृतदेह सापडला. राजेंद्र गुजर हे मंडणगड तालुक्यातील पालवणी-जांभुळनगर इथले रहिवासी आहेत. त्यांचं पार्थिव आज त्यांच्या गावी आणण्यात येईल. तिथे त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

राजेंद्र यांच्या अशाप्रकारे जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. पूर आणि भुस्खलनात अडकलेल्या 169 लोकांना जीवदान देणा-या हेलिकॉप्टरलाच अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होते आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील तिघांचे मृतदेह या पूर्वीच हाती लागले होते. मात्र गुजर यांचा शोध चौथ्या दिवशी लागला. गुजर यांचं प्राथमिक शिक्षण मंडणगड तालुक्यातील पालवणी गावात झालं तर महाविद्यालयीन शिक्षण मंडणगड येथे झालं आहे. गुजर यांचे वडील सैन्यातून सेवानिवृत्त झाले असून मोठा भाऊ देखील सैन्यात आहे.