१० रुपयांच्या नाण्यांसदर्भात 'आरबीआय'चा महत्त्वाचा मेसेज

भारतीय रिझर्व बॅंकेतर्फे नागरिकांना वेळोवेळी महत्वांच्या सूचनांचे एसएमएस येत असतात. अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 13, 2018, 06:38 PM IST
१० रुपयांच्या नाण्यांसदर्भात 'आरबीआय'चा महत्त्वाचा मेसेज

मुंबई : भारतीय रिझर्व बॅंकेतर्फे नागरिकांना वेळोवेळी महत्वांच्या सूचनांचे एसएमएस येत असतात. अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

पण याचा फटका आपल्याला व्यवहार करताना बसण्याची शक्यता असते. त्यामूळे मोबाईलमध्ये आलेले सर्वच एसएमएस दुर्लक्षित करता कामा नये हे आपल्याला नंतर कळतं.

तुम्हाला आला का मेसेज ?

सध्या रिझर्व बॅंकेचा एक एसएमएस प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आला आहे. ही बातमी वाचेवपर्यंत एव्हाना तुमच्याही मोबाईलमध्ये हा मेसेज आला असेल.

आरबीआय दरवेळेस महत्त्वाचे मेसेज ग्राहकांना पाठवत असते. यावेळेस आलेला मेसेज हा १० रुपयांच्या नाण्यांसदर्भातील आहे.

'१० रुपयांची नाणी खोटी ?'

१० रुपयांच्या नाण्यांसदर्भात अनेकजण संभ्रमात असतात.ही नाणी खोटी आहेत असे अनेकांना वाटत असते.

गावाकडच्या ठिकाणी बऱ्याचदा दुकानदारांकडून १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नाहीत.

त्यामुळे ग्राहक मोठ्या संभ्रममात पडतात. काय करावे ? त्यांना सुचत नाही. पण रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने हा संभ्रम दूर केलायं.

असा आहे मेसेज 

 'चिन्हासहित आणि चिन्हाबिगर असलेली १० रुपयांची  नाणी वैध आहेत. ही नाणी विनासंकोच व्यवहारात आणू शकता.

अधिक माहितीसाठी १४४४० वर RBI ला मिस्ड कॉल द्या.'असा मेसेज आरबीआयने पाठवला आहे. 

'आरबीआय'चा हा मेसेज दाखवा 

 त्यामूळे यापुढे १० च्या नाण्यांचा व्यवहार करताना कोणती शंका घेण्याची गरज नाहीए. जे कोणी याबद्दल शंका उपस्थित करत असतील त्यांना 'आरबीआय'चा हा मेसेज नक्की दाखवा. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close