धीरुभाई अंबानींच्या निधनावेळी किती होते रिलायन्सचे नेटवर्थ? सांगून विश्वास नाही बसणार!

Reliance NetWorth: 1981 मध्ये मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांसोबत व्यवसायात एन्ट्री केली.

Pravin Dabholkar | Updated: Apr 19, 2024, 04:57 PM IST
धीरुभाई अंबानींच्या निधनावेळी किती होते रिलायन्सचे नेटवर्थ? सांगून विश्वास नाही बसणार! title=
Reliance NetWorth

Reliance NetWorth: रिलायन्सचा व्यवसाय सर्व क्षेत्रात पसरलाय. रिटेलपासून फायनान्स, टेलीकॉम आणि ऑईल सहित सर्व सेक्टरमध्ये कंपनी अग्रस्थानी आहे. हातातल्या मोबाईलपासून घरच्या विजेपर्यंत सर्व गोष्टीत तुम्हाला रिलायन्स पाहायला मिळते. दहावीचे शिक्षण अर्धवट सोडून धीरुभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर नोकरी केली. त्यानंतर भारतात परतल्यावर मुंबई येथे जागा भाड्याने घेऊन त्यांनी रिलायन्सची सुरुवात केली. दरम्यान धीरुभाई अंबानी यांच्या निधनावेळी रिलायन्सचे नेटवर्थ किती होते? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

1981 मध्ये मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांसोबत व्यवसायात एन्ट्री केली. 1985 मध्ये  रिलायन्स टेक्सटाइल्स इंडस्ट्री असे नाव बदलून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड असे करण्यात आले. यासोबतच त्यांनी टेलिकॉम क्षेत्रात मोठी भरारी घेतली. रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडटची स्थापना करण्यात आली. 

मुकेश अंबानी यांनी 2016 मध्ये रिलायन्स जियोची स्थापना केली. यानंतर कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त जाली. केवळ 58 दिवसांमध्ये जिओ प्लॅटफॉर्मने 52,124.20 कोटी रुपयांची कमाई केली होती. 31 मार्च 2020  रोजी रिलायन्सवर साधारण 1,61,035 कोटी रुपयांचे कर्ज होते. पण मुकेश अंबानींच्या प्लानिंगमुळे हे कर्ज 9 महिन्यापेक्षाही कमी काळात संपले. 

धीरुभाई अंबानी त्यांच्या काळात देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती  होते. 2002 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेव्हा ते जगातील 138 वे सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. फोर्बच्या आकड्यानुसार त्यांचे नेटवर्थ 2.9 अरब डॉलर होते. आजच्या डॉलरच्या किंमतीने याची किंमत भारतीय रुपयानुसार 24 हजार कोटी इतकी होते.  सध्याच्या घडीला रिलायन्सचे मार्केट कॅप 19.79 लाख कोटी रुपये इतके आहे. नुकतेच कंपनीने 20 लाख कोटींचा आकडादेखील पार केलाय. 

समजा रिलायन्स एक देश असता तर तो जगातील 134 देशांच्या यादीत वर असता. कोरोना महामारीत जिथे सर्वच उद्योगांना झळ बसली तिथे रिलायन्सच्या व्यवसायावर फारसा परिणाम झाला नाही. लॉकडाऊन काळात रिलायन्स मोठ्या कंपन्यांसोबतच्या डीलमुळे चर्चेत राहिली.