नागरिकांनो, आणखीन एक नोट येतेय चलनात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. 

Updated: Jul 20, 2017, 04:48 PM IST
नागरिकांनो, आणखीन एक नोट येतेय चलनात title=

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. 

या नोटा महात्मा गांधी सीरीज २००६ च्या असतील. यांची डिझाईन सध्या चलनात असणाऱ्या २० रुपयांच्या नोटांप्रमाणेच असतील. 

आरबीआयनं गुरुवारी एका नोटिफिकेशनद्वारे ही माहिती दिलीय. या नव्या नोटांच्या नंबर पॅनलवर इनसेटमध्ये 'S' लिहिलेलं असेल... तसंच गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरीदेखील या नोटांवर असेल. 

या नव्या नोटांसोबत २० रुपयांच्या नोटाची चलनात कायम राहतील, असं स्पष्टीकरणही आरबीआयनं दिलंय.