'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारींची हत्या

काश्मीरमध्ये ज्येष्ठ पत्रकाराची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे.

Updated: Jun 14, 2018, 09:31 PM IST

श्रीनगर : काश्मीरमध्ये ज्येष्ठ पत्रकाराची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. रायझिंग कश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात  आली  आहे. श्रीनगरच्या प्रेस कॉलनीत हा प्रकार घडलाय. या घटनेनंतर श्रीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी बुखारी यांच्या घरी धाव घेतली आहे.