सलमान खानची जेलमधून सुटका झाल्यानंतर फॅन्सची गर्दी

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानची जामीन मिळाल्यानंतर जेलमधून सुटका झाली आहे. 

Jaywant Patil Updated: Apr 7, 2018, 06:03 PM IST

मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानची जामीन मिळाल्यानंतर जेलमधून सुटका झाली आहे. सलमान खानची जेलमधून सुटका झाल्यानंतर सलमान खानच्या गाडीमागे फॅन्सची गर्दी धावत गेली. सलमान खान चार्टड विमानाने जोधपूरहून मुंबईत येणार आहे. सलमान खानला परवनागीशिवाय परदेशात जाता येणार नाहीय. सलमान खानची सुटका झाल्यानंतर जेलबाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली. सलमान खान रात्री मुंबईत येण्याची शक्यता आहे.