SBI चा खातेधारकांना गंभीर इशार; 'या' 2 क्रमांकावरून कॉल उचलू नका अन्यथा...

SBI Warning to Customers | कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी एसबीआयने ग्राहकांना दोन नंबर शेअर केले आहेत. या दोन नंबरवरून कॉल रिसिव्ह करू नका, असे बँकेकडून सांगण्यात आले.

Updated: Apr 27, 2022, 11:01 AM IST
SBI चा खातेधारकांना गंभीर इशार; 'या' 2 क्रमांकावरून कॉल उचलू नका अन्यथा... title=

SBI Warning to Customers | कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी एसबीआयने ग्राहकांना दोन नंबर शेअर केले आहेत. या दोन नंबरवरून कॉल रिसिव्ह करू नका, असे बँकेकडून सांगण्यात आले.

मुंबई : SBI Warning to Customers | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे. बँकेने हा इशारा 45 कोटी ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी देण्यात आला आहे. याआधीही बँकेकडून ग्राहकांचे वेळोवेळी प्रबोधन केले जाते. आता बँकेच्या वतीने दोन फोन नंबर जारी करून त्या नंबरवरील कॉल रिसिव्ह करू नये असे सांगण्यात आले आहे.

बँक कर्मचारी असल्याचे सांगून फसवणूक

SBI ने म्हटले की, या दोन  क्रमांकावरून फसवणूक होण्याची शक्यता आहे आणि तुमचे नुकसान होऊ शकते. सध्या फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन, कोणत्याही फिशिंग घोटाळ्यापासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी बँकेने हा इशारा दिला आहे. बँकेकडून सांगण्यात आले की, ट्विट, एसएमएस आणि ई-मेलद्वारे फिशिंग घोटाळ्यांची माहिती समोर आली आहे. कॉल केल्यावर हे लोक एसबीआयचे कर्मचारी असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक करतात.

हे दोन क्रमांक

स्टेट बँक ऑफ इंडियाला ज्या दोन क्रमांकावरून कॉल रिसीव्ह न करण्याबाबत सांगण्यात आले आहे. ते आहेत 8294710946 आणि 7362951973. 
या दोन क्रमांकावरून कॉल आल्यास रिसीव्ह करण्याची चूक करू नका, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वी एसबीआयने सांगितलेल्या या दोन्ही क्रमांकाबाबत सीआयडी आसामने इशारा दिला होता. सीआयडी आसामने ट्विट करून सांगितले होते की, स्टेट बँकेच्या ग्राहकांना 8294710946 आणि 7362951973 या दोन क्रमांकावरून कॉल येत आहेत. या क्रमांकांवरून कॉलर ग्राहकाला केवायसीसाठी आणि मोबाइलवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगतो.

दोन्ही क्रमांक बँकेचे नाहीत

बँकेने म्हटले आहे की हे दोन्ही क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)चे नाहीत. एसबीआयच्यावतीने आसाम सीआयडीला रि-ट्विट करताना हे लिहिले आहे की, आयटी सिक्युरिटी या दोन्ही नंबरवर त्वरित कारवाई करेल.