Seema Haider: सीमा हैदरचा 'बेडरूम व्हिडीओ' झाला व्हायरल; Instagram वर कमेंट्सचा पाऊस!

Seema Haider Sachin Meena romantic video:  नुकतंच सीमाने एक खाजगी व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होत असून अनेकांनी शेअर देखील केला आहे.

Updated: Jul 15, 2023, 08:31 PM IST
Seema Haider: सीमा हैदरचा 'बेडरूम व्हिडीओ' झाला व्हायरल; Instagram वर कमेंट्सचा पाऊस! title=
Seema Haider bedroom video

Seema Haider viral video: प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं, असं म्हणत पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) आपल्या चार लेकरांना सोडून दोन्ही देशांची सीमा ओलांडत पाकिस्तानातून भारतात आली. पब्जी खेळत असताना झालेल्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं अन् सचिनसाठी घरदार सोडून सीमाने प्रेमाची परिसीमा ओलांडली. सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर बनून भारतात आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यामुळे आता सीमा हैदर आहे तरी कोण? असा सवाल आता विचारला जात आहे. अशातच आता सीमा हैदरचा एक प्रायव्हेट व्हिडीओ (Private video) समोर आला आहे. 

टीव्ही चॅनेलला मुलाखती देणाऱ्या सीमा हैदरने मुख्य प्रवाहातील माध्यमांपासून दूर राहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिक वेळ घालवण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच सीमाने एक खाजगी व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होत असून अनेकांनी शेअर देखील केला आहे.

सध्या ती आपला प्रियकर सचिन याच्यासोबत ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा भागात राहत आहे. अशातच सीमाने सोशल मीडियावर एक रोमाँटिक व्हिडिओ शेअर केला. सीमा हैदर आणि सचिनच्या या खासगी व्हिडिओमध्ये दोघंही एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. सोशल मीडियावर अॅक्टिव झालेली सीमा आता पाकिस्तानला शिव्या देत असल्याचं दिसतंय. एका व्हिडिओमध्ये सीमाने पाकिस्तानच्या नागरिकांना खडे बोल सुनावले आहेत.

पाहा Video

दरम्यान, सीमाची लहानपणीच्या मैत्रिणीचा एका पाकिस्तानी युवतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मी सीमाला चांगलंच ओळखते. सीमा धोकेबाज आहे, ती हिंदू आणि पाकिस्तानातल्या लोकांना धोका देत आहे, असं तिच्या मैत्रिणीने म्हटलं आहे. सीमा इस्लाम सोडून हिंदू बनली आहे,पुढे जाऊन ती ख्रिश्चनही बनू शकते, असंही या तिच्या मैत्रिणीने म्हटलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर अनेक वाद होताना दिसत आहेत.