माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

 माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय.  

Surendra Gangan Updated: Jul 5, 2018, 05:04 PM IST
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर title=

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी थरूर यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. त्यानंतर थरुर यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयानं तो मान्य केला असून त्यांना पुराव्यांना छेडाछड न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यासाठी १ लाखाच जातमुचलाका द्यावा लागणार आहे.

थिरुअनंतपुरमचे खासदार असलेल्या थरुर यांना यापूर्वी आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आले आहे. विशेष न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर गुरुवारपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. पोलिसांच्यावतीने सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी कोर्टात शरुर यांच्या जामिनाच्या मागणीला विरोध केला होता.

७ जुलै रोजी न्यायालयात  हजर राहण्यास सांगितले होते. आदेश दिल्यानंतर न्यायालयाने थरुर यांच्याविरोधात कारवाई करण्यास पुरेसा आधार असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर थरुर यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.