बापरे! अभ्यास कर म्हणून सांगितलं, मुलानं उचचलं असं पाऊल... ऐकून बसेल धक्का

जाणून घ्या नेमक काय झालं...

Updated: Sep 16, 2022, 06:31 PM IST
बापरे! अभ्यास कर म्हणून सांगितलं, मुलानं उचचलं असं पाऊल... ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : लहान मुलांना मस्ती करण्यापासून थांबवण आणि अभ्यास करणं सांगितलेलं आवडत नाही. अशा वेळी लहान मुलं अनेक कारण शोधत असतात. सध्या एक मोठी बातमी समोर आली असून अभ्यास कर म्हणतं वडिलांनी ओरडल्यामुळे मुलानं चक्क पोलिसात तक्रार केली आहे. कौशांबी जिल्ह्यात ही विचित्र घटना घडली आहे. मात्र, त्यामागील संपूर्ण गोष्ट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. मुलानं अभ्यास करावा म्हणून वडील त्याला समजावत होते. तर मुलानं चक्क वडिलांविरोधात अवैध शस्त्र असल्याचा केला आरोप. फक्त समजावलं म्हणून मुलगा इतका संतप्त होईल की त्यांना तुरुंगात जावे लागेल असे कोणाला वाटले होते. 

आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी

सरायकिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोपा गावातून 112 क्रमांकावर पोलिसांना फोन करून 19 वर्षीय मोहम्मद आझमनं सांगितलं की आमचे वडील अब्दुल कुद्दूस यांच्याकडे अवैध बंदुक आहे. जे ते सोबत घेऊन जातात. माहिती मिळताच पोलिसांनी खोपा गावात पोहोचून अब्दुल कुद्दूसला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून अवैध शस्त्र जप्त करण्यात आलं. वडील अब्दुल कुद्दूस म्हणाला की, मुलाला अभ्यासकर म्हणून ओरडल्यानंतर रागाच्या भरात मुलानं असं केल्याचं समोर आलं आहे.  (Shocking father scolded son for his studies angry Muhammad called police and sent father to jail )

आणखी वाचा : नोरा, Jacqueline मागोमाग 'ही' मराठी अभिनेत्रीसुद्धा सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, पाहा कुठे फसली

दरम्यान, पोलीस अधीक्षक हेमराज मीना यांनी सांगितले की, सरायकिल पोलीस ठाण्यात एका व्यक्तीला पकडण्यात आलं आहे. त्यांच्याकडून 315 बोरची अवैध पिस्तूल मिळाली. वडील आणि मुलामध्ये काही गोष्टीवरून वाद झाला, त्याच गोष्टीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे अवैध बंदुक सापडली. अब्दुल कुद्दूस अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली असून याबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.