गुजरात-राजस्थानला पुराचा वेढा, पंतप्रधानांकडून पाहणी

 गुजरात आणि राजस्थानच्या काही भागाला पुराचा वेढा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची करणार हवाई पाहाणी केली. तर बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गुजरातमध्ये ७ हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 25, 2017, 11:31 PM IST
गुजरात-राजस्थानला पुराचा वेढा, पंतप्रधानांकडून पाहणी title=

अहमदाबाद  :  गुजरात आणि राजस्थानच्या काही भागाला पुराचा वेढा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची करणार हवाई पाहाणी केली. तर बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गुजरातमध्ये ७ हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेय.

 गुजरातमध्ये पूरानं हाहाकार उडवलाय. गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना पूराचा वेढा बसलाय. पूरामुळे आतापर्यंत ७० नागरिकांना जीव गमवावा लागला असून सात हजाराहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. 

गुजरातच्या बनासकांठा इथं भारतीय हवाई दलाने ११३ नागरिकांची पूरातून सुखरुप सुटका केलीय. गंभीर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. 

तत्पूर्वी मोदींनी अहमदाबादमध्ये उच्च स्तरीय बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री विजय रुपानी, मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी गुजरातमधील पूरस्थिती आणि मदत तसंच बचावकार्याबाबत मोदींना माहिती देण्यात आली.