'या' राज्यात आढळला कोरोनाचा पहिलाच रुग्ण

कोरोना संसर्गग्रस्त आढळलेला रुग्ण 25 वर्षीय विद्यार्थी आहे. 

Updated: May 23, 2020, 10:31 PM IST
'या' राज्यात आढळला कोरोनाचा पहिलाच रुग्ण title=
संग्रहित फोटो

गंगटोक : सिक्किममध्ये शनिवारी कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना संसर्गग्रस्त आढळलेला रुग्ण 25 वर्षीय विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी दिल्लीहून सिक्किममध्ये आला होता. हा विद्यार्थी दिल्लीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता. 

आरोग्य विभागाचे महासंचालक सहसचिव पेम्पा शेरिंग भूटिया यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, विद्यार्थ्याचे सॅम्पल तपासणीसाठी सिलिगुडी येथील उत्तर बंगाल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. रिपोर्ट आल्यानंतर हा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.

या रुग्णावर सर थूतोब नामग्याल स्मारक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

राज्य सरकारने राज्यात 15 जूनपासून शाळा, महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री के.एन. लेप्चा यांनी, आम्ही 15 जूनपासून सर्व शाळा आणि महाविद्यालयं सुरु करत आहोत. नववी आणि दहावीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. तर नर्सरी ते आठवीपर्यंतचे वर्ग बंद राहणार आहे. सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करण्यासाठी शाळांमध्ये सामुहिक प्रार्थना होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

आयसोलेशनमध्ये न राहणाऱ्यांना जेलमध्ये पाठवणार; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा