देशाला भाजपपासून धोका - सोनियांचं उद्धव ठाकरेंना पत्र

सोनिया गांधी यांची मात्र शपथविधी सोहळ्याला अनुपस्थिती... 

Updated: Nov 28, 2019, 06:20 PM IST
देशाला भाजपपासून धोका - सोनियांचं उद्धव ठाकरेंना पत्र title=

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, 'शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस असाधारण परिस्थितीमध्ये देखील एकत्र आले आहेत. हे तिन्ही पक्ष अशा वेळी एकत्र आले आहेत, ज्यावेळी देशाला भाजपपासून अभूतपूर्व अशा धोक्याचा सामना करावा लागत आहे.'

सोनिया गांधी यांनी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकत नसल्यामुळे खेद व्यक्त करत म्हटलं की, 'राजकीय वातावरण विषारी झालं आहे. अर्थव्यवस्था बिघडली आहे, शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. आपण एक कॉमन प्रोग्राम आखला आहे. मला विश्वास आहे की, हे तिन्ही पक्ष यामधील गोष्टींसोबत जोडलेले राहू. महाराष्ट्रातील लोकांना आशा आहे की, एक पारदर्शक, जबाबदारी, संक्रीय सुशासन आपण सगळे मिळून त्यांना देऊ.'

शिवसेनेने या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आमंत्रण दिलं आहे. तसेन विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय 500 हून अधिक शेतकरी देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

शिवाजी पार्क म्हणजेच शिवसैनिकांचं शिवतिर्थ असलेल्या या मैदानात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याने 1995 ला देखील शपथ घेतली होती. त्यावेळी ते भाजपसोबत सत्तेत बसले होते. त्यानंतर 1999 मध्ये शिवसेनेतून नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते. आता तिसऱ्यांदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे.