'मौत का कुआं' मध्ये अचानक घडला अपघात, व्हायरल व्हिडीओ पाहून चुकेल काळजाचा ठोका

 'मौत का कुआं' मध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन दुचाकी अचानक खाली जमिनीवर कोसळल्या आणि त्यानंतर एक मारुती कारही जमिनीवर कोसळलेली. 

Updated: Jul 26, 2022, 06:59 PM IST
'मौत का कुआं' मध्ये अचानक घडला अपघात, व्हायरल व्हिडीओ पाहून चुकेल काळजाचा ठोका title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपलं मनोरंजन करतात. तर काही व्हिडीओ हे लोकांना आश्चर्यचकीत करतात. परंतु सध्या व्हायरल झालेला फोटो हा धक्कादायक आहे. जो पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. ही बातमी उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील आहे, जिथे एका जत्रेत 'मौत का कुआं' स्टंट दरम्यान एक अपघात घडला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियासमोर आला आहे.

वास्तविक 'मौत का कुआं' मध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन दुचाकी अचानक खाली जमिनीवर कोसळल्या आणि त्यानंतर एक मारुती कारही जमिनीवर कोसळलेली. ही कार दुचाकीस्वारांच्या अंगावर कोसळली. या अपघाताचा लाइव्ह व्हिडिओ कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केला, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे संपूर्ण प्रकरण अमरोहा जिल्ह्यातील उजारी शहराचे आहे, जिथे गेल्या अनेक दिवसांपासून उर्स मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे. त्याचवेळी जत्रेत 'मौत का कुआं' मध्ये पडून अपघात झाला.

वास्तविक, 'मौत का कुआं' मध्ये स्टंटबाजी करणारे दोन दुचाकीस्वार अचानक दुचाकीसह जमिनीवर कोसळतात आणि तेवढ्यात त्यांच्या मागे धावणारी मारुती कारही दुचाकीस्वारांच्या अंगावर कोसळते. 'मौत का कुआं'  अचानक झालेल्या या अपघातामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले आहे आणि त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 'मौत का कुआं' पडलेल्या या अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ तिथे उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.