सर्वोच्च न्यायालयाचा कर्नाटक बहुमत प्रकरणी भाजपाला सल्ला

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक बहुमत सिद्ध करण्याप्रकरणी भाजपला सल्ला दिला आहे की,

Updated: May 18, 2018, 11:17 AM IST
सर्वोच्च न्यायालयाचा कर्नाटक बहुमत प्रकरणी भाजपाला सल्ला title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक बहुमत सिद्ध करण्याप्रकरणी भाजपला सल्ला दिला आहे की, उद्याचं विधिमंडळात बहुमत सिद्ध करा. कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी बहुमताचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे, यात सध्या दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी भाजपाने आपल्यासोबत बहुमताचा आकडा पार होईल, एवढे आमदार असल्याचा दावा केला आहे, तसेच भाजपाचा वकिलाने कोण आमदार भाजपासोबत आहेत, याची यादी देणे बंधनकारक नसल्याचा देखील युक्तिवाद केला होता, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान भाजपाला सल्ला दिला की, तुमच्याकडे बहुमत असेल, तर तुम्ही उद्याच विधिमंडळात बहुमत सिद्ध करा.

भाजपाला कर्नाटक विधानसभेत सर्वात जास्त १०४ जागा, मिळाल्या आहेत पण बहुमतासाठी भाजपाला ११२ जागा आवश्यक आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून कर्नाटकाच्या राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे, यावरून काँग्रेस आणि जेडीएसने कोर्टात याचिका दाखल केली आहे.