दहशतवादी हल्ल्याची पूर्वकल्पना असताना योग्य खबरदारी का घेतली नाही?

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची पूर्वकल्पना केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफला दिली होती, अशी नवी माहिती हाती आली आहे. 

ANI | Updated: Feb 15, 2019, 07:09 PM IST
दहशतवादी हल्ल्याची पूर्वकल्पना असताना योग्य खबरदारी का घेतली नाही? title=

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची पूर्वकल्पना केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफला दिली होती, अशी नवी माहिती हाती आली आहे. केंद्रीय गृह खात्याने गेल्या ८ फेब्रुवारी रोजी काश्मिरातील सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेल्या या पत्राची प्रत 'झी २४ तास'च्या हाती लागली आहे. दहशतवाद्यांमार्फत आयईडीचा वापर करून हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुकड्या रवाना करण्यापूर्वी संपूर्ण परिसर सुरक्षित आहे, याची नीट खातरजमा करुन घ्या, अशी सावधगिरीची सूचना या पत्रात देण्यात आली होती. त्यामुळे केंद्र सरकारने सावध केलेले असतानाही योग्य खबरदारी का घेतली गेली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

सीआरपीएफने दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. सीआरपीएफमध्ये संतापाची लाट आहे. यावर सीआरपीएफने काय ट्विट केले आहे. दहशतवादी हल्ल्यावर सीआरपीएफचं ट्विट केले आहे. 'विसरणार नाही, माफही करणार नाही' 'भ्याड हल्ल्याचा बदला घेणार'. दरम्यान, पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी थेट दिल्लीतल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. पुलवामातला हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी उच्चायुक्ताल परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

दरम्यान, पुलवामात दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलावर सर्वात मोठा भ्याड हल्ला केलेला असताना शेजारी असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गप्प आहेत. जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला जात असताना इम्रान खान मात्र गप्प बसलेत. त्यांनी निषेधाचा ट्विटही केले नाही. किंवा शोकसंदेशही दिलेला नाही. इम्रान खान यांचं मौन म्हणजे दहशतवाद्यांचं समर्थन आहे का असा सवाल विचारला जातोय.