बापरे! पोलीसच निघाला चोर, पोरगं झोपेत असताना...; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद!

पोरगं झोपेत असताना पोलिसाने केलं धक्कादायक कांड!

Updated: Oct 9, 2022, 11:12 PM IST
बापरे! पोलीसच निघाला चोर, पोरगं झोपेत असताना...; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद! title=

CCTV VIDEO : कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस व्यवस्था असते. म्हणजेच पोलिसांकडून (Police) सर्व लोकांना न्याय आणि सत्याची अपेक्षा असते. पण पोलीसच चोरी करू लागले तर? तुम्ही कधी याचा विचार केलाय का? मात्र, असाच एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय. ज्यामध्ये पोलीसच चोर निघाल्याचं पहायला मिळतंय.

कानपूरच्या महाराजपूरच्या छतमारा चौकातील ही घटना आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असता दुकानाजवळील सीसीटीव्ही कॅमेरातून (CCTV Footage) हा धक्कादायक प्रकार समोर आला. फुटेज पाहून पोलिसांच्याही झोपा उडाल्या. गस्तीदरम्यान लोकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी झोपलेल्या तरुणाचा मोबाईल चोरला होता.

आणखी वाचा - Shivsena संकटात असताना मनसेने शेअर केला 'तो' व्हिडीओ

हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. प्रकरण जास्तच व्हायरल झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलला (Police Constable) निलंबित करण्यात आलंय. कॉन्स्टेबलसोबत एक होमगार्ड जवानही घटनास्थळी होता. होमगार्ड जवानावरही कारवाई करण्यात येणार आहे.

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान, कोणतीही भीती न बाळगता पोलीसानेच ही चोरी केली. पीडित व्यक्तीने कॉन्स्टेबलविरुद्ध महाराजपूर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.