Gold Silver च्या दरात बदल नाही, मात्र चांदीचे भाव...

आज सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे. सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात १५० रुपयांनी बदल झालेला आहे.

Updated: Aug 22, 2022, 10:30 AM IST
 Gold Silver च्या दरात बदल नाही, मात्र चांदीचे भाव...  title=

Gold- Silver Price Today : सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. आज सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे. सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात १५० रुपयांनी बदल झालेला आहे.

आज भारतात २२ कॅरेट सोन्याची सरासरी किंमत ४७,८०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीची सरासरी किंमत ५५,६०० रुपये प्रति किलो झाली आहे. 

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,८०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,८३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५५५ रुपये आहे.

चांदीची आजची किंमत
आज चांदीच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे आणि सरासरी किंमत ५५,६०० रुपये प्रति किलो आहे. प्रमुख शहरांबद्दल बोलायचे झाल्यास मुंबई, दिल्ली, लखनऊ आणि पटना मध्येही किंमत ५५,६०० रुपये प्रति किलो आहे तर चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, विजयवाडा इत्यादी दक्षिणेकडील शहरांमध्ये किंमत ६१,३०० रुपये प्रति किलो आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा दर

चेन्नई         : ४८, ३०० (२२ कॅरेट), ५२,६९० (२४ कॅरेट)

मुंबई         : ४७,८०० (२२ कॅरेट), ५२,१५० (२४ कॅरेट)

दिल्ली       : ४७,९५० (२२ कॅरेट), ५२,३१० (२४ कॅरेट)

कोलकाता : ४७,८०० (२२ कॅरेट), ५२,१५० (२४ कॅरेट)

जयपूर      : ४७,९५० (२२ कॅरेट), ५२,३१० (२४ कॅरेट)

लखनऊ   : ४७,९५० ( २२ कॅरेट), ५२,३१० (२४ कॅरेट)

पाटणा     : ४७,८३० (२२ कॅरेट), ५२,१८० (२४ कॅरेट)

पुणे         : ४७,८३० (२२ कॅरेट), ५२,१८० (२४ कॅरेट)

नागपूर    : ४७,८३० (२२ कॅरेट), ५२,१८० (२४ कॅरेट)

नाशिक   : ४७,८३० (२२ कॅरेट), ५२,१८० (२४ कॅरेट) 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप असून ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. त्याचबरोबर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.