VIDEO : हम किसीसे कम नहीं! साडी नेसली म्हणून काय झालं...

Viral Video : अनेक जण जिममध्ये न जाण्यासाठी बहाणे शोधतं असतात. कधी वेळ नाही, तर कधी जिममध्ये जाण्यासाठी योग्य शूज नाही तर कोणी म्हणतं जिममध्ये जाण्यासाठी विशेष कपडे नाहीत. पण आता नाही, कारण...

Updated: Jan 6, 2023, 11:27 AM IST
VIDEO : हम किसीसे कम नहीं! साडी नेसली म्हणून काय झालं... title=
Trending Video Girl With Saree Doing gym workout Viral on social media

Trending Video : नवीन वर्षांचं संकल्प म्हणून अनेकांनी जिममध्ये जाऊन व्यायाम (Exercise Video) करण्याचा ठरवलं आहे. पण काही जण अजूनही जिममध्ये (GYM Video) जाण्यासाठी कंटाळा करत आहेत. अशा लोकांनी सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होतं असलेला हा व्हिडिओ (Viral Video) नक्की बघावा. आपण फिट राहवं किंवा आपलं वजन नियंत्रणात राहवं म्हणून लोक जिममध्ये दिवसरात्र मेहनत करतात. जिम म्हटलं की शूट आणि विशेष कपड्यांची गरज असंच काहीस चित्र कायम आपण पाहिलं आहे. जिममध्ये जाण्यासाठी खास ट्रेनिंगसाठी (training Video) विशेष कपडे सांगितले जातात. त्यामुळे आपण कायम जिममध्ये जाणाऱ्या लोकांना खास करुन महिलांना टीशर्ट आणि ट्रक पॅन्ट (T-shirt and truck pants) घालण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे ज्या महिलांना अशा पोषाखात वावरणं अवघड जात किंवा अनेक महिला आहे ज्या असे पोशाख घालतं नाही. अशा महिलांसाठी सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेली महिला प्रेरणादायी आहे. 

हम किसीसे कम नहीं!

साडी ही महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज महिला साडी नेसून अनेक काम करताना दिसतात. अगदी शेतात राबणाऱ्या महिलेपासून चार चाकी गाडी चालवारी महिला आपण पाहिली आहे. पण तु्म्ही कधी जिममध्ये साडी नेसून वर्कआऊट (Girl Gyming In Saari Video) करणारी महिला पाहिली आहे का? ऐकून पण धक्का बसला ना...पण जर आम्ही तुम्हाला अशा महिलेचा एक व्हिडिओ दाखवला तर... सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला चक्क साडी नेसून वर्क आऊट करताना दिसतं आहे. (Trending Video Girl With Saree Doing gym workout Viral on social media)

 

हेसुद्धा वाचा - Video : साडी नेसून जेव्हा सासू माँ जिममध्ये आली आणि...

 

साडी नेसली म्हणून काय झालं...

या महिलेने सिद्ध केलं आहे की, जर एखादी गोष्ट ठरवलं तर त्यासाठी कुठल्याही अडथळा होऊ शकतं नाही. अगदी जिममध्ये साडी नेसली म्हणून आपण वर्क आऊट करु शकतं नाही हा गैरसमज दूर केला आहे. जिममध्ये कायम टीशर्ट आणि ट्रक पॅन्ट घालून जाण्याचा परंपरेला या महिलेने तडा दिला आहे. एवढंच नाही या महिलेने साडी नेसून (Girl With Saree Doing Exercise) ट्रकचा एक जड टायरही डोक्यावर उचलला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे. 

काकूंचा स्वॅग पाहून पोरांना फुटला घाम

सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या या काकू रीना सिंग आहेत. या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. रीना सिंग काकूच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळतात. या व्हिडिओमध्ये रीना सिंग गुलाबी रंगाची साडी नेसून व्यायाम करताना दिसतं आहे, हे पाहून तरुणांना घाम फुटला आहे. या व्हिडिओ आतापर्यंत 16 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.