व-हाड घेऊन निघालेला ट्रक नाल्यात कोसळला, २६ जणांचा मृत्यू

लग्नाचं व-हाड घेऊन निघालेला ट्रक पुलावरून नाल्यात कोसळल्याने सुमारे 26 जणांचा मृत्यू झालाय.

Updated: Mar 6, 2018, 04:42 PM IST
व-हाड घेऊन निघालेला ट्रक नाल्यात कोसळला, २६ जणांचा मृत्यू  title=

भावनगर : लग्नाचं व-हाड घेऊन निघालेला ट्रक पुलावरून नाल्यात कोसळल्याने सुमारे 26 जणांचा मृत्यू झालाय. गुजरातच्या भावनगरमध्ये हा भीषण अपघात झाला. या ट्रकमध्ये जवळपास ७० जण होते.  समोरून येणा-या कारला वाचविण्याच्या नादात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक नाल्यात कोसळला. या अपघातात २६ व-हाडी मृत पावले असून १२ जण जखमी झालेत. अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.