लोकांना झालंय तरी काय? ती रक्त्याच्या थारोळ्यात तडफत होती, लोकं Video बनवत होते

पोलीस अधिकाऱ्याने जखमी मुलीला उचललं आणि रुग्णालयाच्या दिशेने निघाले

Updated: Oct 25, 2022, 07:50 PM IST
लोकांना झालंय तरी काय? ती रक्त्याच्या थारोळ्यात तडफत होती, लोकं Video बनवत होते title=

Crime News : माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आहे. 12 वर्षांची एक अल्पवयीन मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मदतीसाठी ती याचना करत होती, पण लोकं तिला मदत करण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ (Bystanders Recording Videos) आणि फोटो काढण्यात मग्न होतं. उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) कन्नोजमध्ये (Kannauj) ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. समोरचं दृष्य पाहून पोलिसही हैराण झाले. गंभीर अवस्थेत ती मुलगी पडली होती, आजूबाजूला बरीच गर्दी जमली होती, पण त्यातला एकही माणूस मदतीला पुढे आला नव्हता. पोलीस अधिकारी मनोज पांडे (Police Officer Manoj Pande) यांनी तात्काळ त्या मुलीला उचललं आणि रस्ताच्या दिशेने धावत निघाले. एक रिक्क्षा (Auto Rikshaw) थांबवत त्यांनी मुलीला रुग्णालयात नेलं. 

रुग्णालयात मुलीवर उपचार सुरु असून मुलीची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. मुलगी सध्या बोलण्याच्या अवस्थेत नसून तिच्या घरच्यांकडूनही काहीच माहिती मिळत नाहीए. चुकीच्या कामासाठी तिचं अपहरण करण्यात आल्याचं तिच्या कुटुंबियांचा दावा आहे. 

पिगीबँक घेण्यासाठी पडली होती घराबाहेर
कन्नोजमधल्या गुरसहायगंज परिसरात रहाणारी 12 वर्षांची ही मुलगी मातीची पिगीबँक खरेदी करण्यासाठी रविवारी दुपारी बाजारात गेली होती. यावेळी काही जणांनी तिचं अपहरण केलं. बराचवेळ मुलगी घरी परत न आल्याने कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरु केली. यानंतर संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास डाक बंगला गेस्ट हाऊसच्यामागे मुलगी जखमी अवस्थेत पडलेली आढळून आली. पोलिसांनी मुलीला गुरसहायगंजमधल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं, त्यानंतर तिला तिर्वा इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं. 

नातेवाईकांनी केला बलात्काराचा आरोप
मुलीच्या मामांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा दावा केला आहे. यानंतर तिला मारहाण करत जखमी अवस्थेत टाकण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून डाक घर ते मुलीच्या घरादरम्यान असलेल्या रस्त्यांवरच्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी एका तरुणाबरोबर बोलत जात असल्याचं आढळून आलं आहे. फुटेजच्या आधारे पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत.