नवऱ्याचं मनं मोठं! पत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडली म्हणून गावासमोर लावून दिलं लग्न

UP Wife Love Story: तरुणाने पंचायत बोलावली आणि पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. ही बाब आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jun 30, 2023, 08:53 PM IST
नवऱ्याचं मनं मोठं! पत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडली म्हणून गावासमोर लावून दिलं लग्न  title=

UP Wife Love Story: नवरा आणि बायकोच्या नात्यात कोण्या तिसऱ्याची एन्ट्री झाल्याने अनेक संसार बिघडल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. कोणत्याच नवरा अथवा बायकोला आपला पार्टनर हा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीसोबत असेलेले अजिबात आवडत नाही. पती लग्नानंतर पत्नीला तिच्या प्रियकराच्या हवाली करतो, हे फक्त आपण सिनेमातच पाहिले आहे. पण असेच एक प्रकरण मिर्झापूरमधून समोर आले आहे. जिथे तरुणाने पंचायत बोलावली आणि पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. ही बाब आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

मिर्झापूरमध्ये लग्नाच्या वर्षभरानंतर एका वराने पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. संत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. जेथे वर्षभरापूर्वी दिनेशचा हलिया पोलीस ठाणे हद्दीतील गुलाबीसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये सर्व काही सुरळीत चालले होते. मात्र यामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाला. शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत पत्नीचे बोलणे सुरू झाले. न्यूज 18 ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मंदिरात गावकऱ्यांसमोर लग्न

बोलण्यामुळे दोघांमध्ये जवळीक वाढली. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्यातील संभाषण पतीला समजले. याबाबत सुरुवातील पतीने पत्नीशी संवाद साधला. पण पत्नी प्रियकरसोबत राहण्याच्या हट्टावर कायम होती. त्यानंतर पतीने पत्नीला प्रियकरासोबत राहण्यास होकार दिला. गावातील मंदिरात मंगलाष्टके घेऊन हा विवाह पार पडला. लग्न झाल्यानंतर गुलाबी तिचा दुसरा नवरा राहुलच्या घरी गेली. 

या घटनेची आपल्याला माहिती नाही. असे कोणतेही प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आलेले नाही. आजपर्यंत कोणालाच कळले नाही. तक्रार आल्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया संतनगर पोलीस ठाण्याचे प्रभारींनी दिली. 

दुसरीकडे, गावात राहणाऱ्या विवाहितेचे शेजारील तरुणाशी प्रेमसंबंध होते. हा प्रकार पतीला समजल्यानंतर पत्नीने प्रियकराकडे राहण्याचा हट्ट धरला. नवऱ्याची हरकत नसताना दोघांनी गावकऱ्यांनी मंदिरात लग्न लावून दिले, अशी प्रतिक्रिया गावप्रमुख राम नरेश यांनी दिली.