अमेरिका- इराण तणाव, कच्च्या तेलाच्या किमती भडकणार?

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती आहे.  

PTI | Updated: Jun 22, 2019, 07:56 AM IST
अमेरिका- इराण तणाव, कच्च्या तेलाच्या किमती भडकणार? title=

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती आहे. याबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री खालिद-अल-फलिह यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. 

ओपेक देशांत प्रमुख सदस्य असलेल्या सौदीला तेलाच्या किंमती स्थिर ठेवण्याबाबत सक्रीय भूमिका निभावण्याची विनंती यावेळी प्रधान यांनी केली आहे. कच्चा तेलाच्या किंमती भडकल्यात तर त्याचा परिणाम हा पेट्रोल आणि डिझेलवर होण्याची शक्यता जास्त आहे. जर कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाली तर पेट्रोल आणि डिझेल यांचे दर भारतात वाढ शकतात. त्यामुळे आधीच शंभरीच्या दिशने वाटचाल करणारे पेट्रोल आणि डिझेल यामुळे तो टप्पा गाढण्याची शक्यता आहे.

भारत तेलाबाबत ८३ टक्के आयातीवर अवलंबून आहे. यावेळी चर्चेदरम्यान प्रधान यांनी होरमूज स्ट्रेटबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यातर भारताला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. लोकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होऊ शकते. त्यामुळे भारताकडून अमेरिका - इराण तणावावर नजर ठेवण्यात येत आहे. ओपेके जर कच्चा तेल्याच्या किमतीत वाढ झाली तर काय करायचे, असा प्रश्न भारतसमोर आहे. त्यामुळे भारताकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.