सुहाग रात है घुंघट उठा रहा हुँ! हनिमूनला पदर उचलताच किंचाळला तरुण; 5 दिवस झोपूच शकला नाही

तरुणाने पत्नीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीही बोलण्यास नकार दिला

Updated: Nov 16, 2022, 03:51 PM IST
सुहाग रात है घुंघट उठा रहा हुँ! हनिमूनला पदर उचलताच किंचाळला तरुण; 5 दिवस झोपूच शकला नाही title=

Bride ran away with cash and jewelry : लग्नातील (marriage) गोंधळ हा अनेकांना नवा नाही. अनेक तरुणांना लग्नसाठी मुलगी मिळत नसल्याने अनेकांना बोलणी खावी लागतात. तर अनेक तरुण कंटाळून याबाबत सातत्याने तक्रार करताना दिसतात. अशाच लग्नाळू तरुणांना गाठून त्यांची फसवणूक (Fraud) होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पण उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) एटामध्ये घडलेल्या घटनेने लग्न पार पडलेल्या कुटुंबासह सर्वांनाच धक्का बसलाय. लग्नानंतर नवऱ्याची हनिमूनची (honeymoon) तयारी सुरू होती. नवरी नवऱ्याच्या खोलीत आली. तरुणाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने नकार दिला. नवऱ्याला राहावले नाही म्हणून त्याने पत्नीचा चेहऱ्यावरील पदर उचलला. चेहऱ्यावरून पदर हटवताच तरुण जोरात किंचाळला.

नवरीच्या चेहऱ्यावरुन पदर हटवताच तरुणाला धक्का बसला. यानंतर पाच दिवस तो झोपलाच नाही. धुमरी शहरातील रहिवासी असलेल्या तरुणाने मे महिन्यात दिल्लीमध्ये एका तरुणीसोबत लग्न केले होते. ती घरी आल्यावर सर्वांना आनंद झाला. पण नंतर कळले की वधू एक तृतीयपंथी (transgender) आहे. हे रहस्य उघड झाल्यानंतर आता तरुणाने गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाने सांगितले की, मनोकामना सिद्ध दुर्गा मंदिर शाळा ब्लॉक पार्ट-2, शकरपूर, दिल्ली येथे राहणाऱ्या मुलीसोबत त्याचे लग्न ठरले होते. 3 मे रोजी दोघांचे लग्न झाले. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी काहीही सांगितले नाही. 3 मे रोजी ते दिल्लीला पोहोचले आणि लग्नानंतर दुसऱ्या दिवशी तरुण वधूसोबत घरी पोहोचला. प्रथेनंतर महिलांनी तरुणाला मधुचंद्रासाठी खोलीत पाठवले.

यादरम्यान तरुणाला पत्नीशी बोलण्याची संधी मिळाली. पण तिने बोलण्यास नकार दिला. तसेच पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पत्नीने पुन्हा नकार दिला आणि तिने सांगितलेली हकीकत ऐकून तरुणाला धक्काच बसला. पत्नीने तृतीयपंथी असल्याचे सांगितले.

पत्नीने आणि तिच्या कुटुंबियांनी किन्नर असल्याची गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. पाच दिवसांनी आरोपी पत्नी, सासू, सासरे जावयाच्या घरी आले आणि दागिने, पैसे घेऊन पळून काढला. तरुणाने दागिने आणि पैसे मागितले असता आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. त्यानंतर तरुणाने जैथरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पत्नी किन्नर असल्याचे समजल्यानंतर त्याला पाच दिवस झोप लागली नाही, सहाव्या दिवशी तो झोपला तेव्हा सासरचे लोक दागिने व पैसे घेऊन पळून गेले. तरुणाचे कुटुंबीय मुलीला पाहण्यासाठी गेले होते त्यावेळी काहीही सांगितले नव्हते. त्यामुळे तरुणानेही लग्नाला होकार दिला होता.