Uttarkashi Tunnel Rescue: बोगद्यातून कधी बाहेर येणार कामगार? रेस्क्यू टीमने बनवला 'हा' खास प्लॅन

Uttarkashi Tunnel Latest Update: बोगद्याच्या ढिगाऱ्यात ड्रेनेज पाईप टाकण्याचे काम करणाऱ्या ऑगर मशिनमध्ये पुन्हा बिघाड झाला असून, ते दुरुस्त करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी पूर्ण क्षमतेने काम करतायत.

सुरभि जगदीश | Updated: Nov 25, 2023, 06:43 AM IST
Uttarkashi Tunnel Rescue: बोगद्यातून कधी बाहेर येणार कामगार? रेस्क्यू टीमने बनवला 'हा' खास प्लॅन title=

Uttarkashi Tunnel Latest Update: गेल्या 14 दिवसांपासून उत्तरकाशीच्या बोगद्यात तब्बल 41 कामगार अडकले आहेत. या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुरक्षित बाहेर पडण्याची वाट संपूर्ण देश पाहतोय. बोगद्यात कामगार अडकून 14 दिवस झालेत. बचाव पथक युद्धपातळीवर कार्यरत आहे. दरम्यान या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये विलंब का होतोय, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. 

बोगद्याच्या ढिगाऱ्यात ड्रेनेज पाईप टाकण्याचे काम करणाऱ्या ऑगर मशिनमध्ये पुन्हा बिघाड झाला असून, ते दुरुस्त करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी पूर्ण क्षमतेने काम करतायत. अशा परिस्थितीत आत अडकलेल्या कामगारांना अजून एक रात्र बोगद्यात काढावी लागली

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर ऑगर मशीन दुरुस्त न झाल्यास किंवा दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा बिघाड झाल्यास आधुनिक उपकरणाद्वारे मॅन्युअल ड्रिलिंग करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय एका उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी बचाव कार्यात गुंतलेल्या तज्ज्ञांनी पर्यायी योजना तयार केली आहे. मात्र, या पर्यायी योजनेचं शनिवारी सकाळीच सुरू होण्याची शक्यता आहे.

अडकलेले कामगार डॉक्टरांच्या देखरेखीखाली

या बोगद्यात कामगार गेल्या 14 दिवसांपासून बोगद्याच्या आत अडकले आहेत. अशा परिस्थितीतही कामगारांचं मनोबल वाढवण्यासाठी मानसशास्त्रज्ञांचीही मदत घेण्यात येतेय. कामकाजास उशीर झाल्यामुळे कामगारांना लुडो, बुद्धिबळ, पत्ते खेळण्याचे खेळ देण्यात आलेत. कामगार बोगद्याच्या आत योगासनेही करतात, जेणेकरून ते तणावमुक्त राहतील. याशिवाय डॉक्टरांची टीम दररोज कामगारांशी चर्चा करून त्यांची प्रकृती आणि मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतेय. त्याशिवाय बचाव पथक रोज अर्धा तास बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी संवाद साधतायत.

कामगारांना पाठवण्यात आल्या खाण्याच्या गोष्टी

उत्तराखंडचे मुख्यमंत्री सीएम पुष्कर धामी देखील कामगारांशी चर्चा करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून बचाव मोहिमेची माहिती घेतली. बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना नाश्त्यासाठी काही पदार्थ आणि फळे पाठवण्यात आली. बोगद्याच्या आत अडकलेल्या लोकांना बाहेरील परिस्थिती आणि हवामानाची माहिती दिली जाणार आहे. बोगद्याच्या आत आणि बाहेरील तापमानात मोठी तफावत असल्याने कामगारांना तातडीने बाहेर काढलं जाणार नसल्याची डॉक्टरांनी दिली आहे.