इंटरनेटवर सर्वात Cutest Video होतोय व्हायरल

प्रेम हे कधीही आणि कुठेही होऊ शकतं. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 11, 2018, 04:13 PM IST
इंटरनेटवर सर्वात Cutest Video होतोय व्हायरल  title=

मुंबई : प्रेम हे कधीही आणि कुठेही होऊ शकतं. 

याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हायरल होणार व्हिडिओ. जर तुम्हाला त्या प्रेमाची बाधा झाली तर तुम्ही समजू शकता की, त्या प्रेमाला कुणीही अडवू शकत नाही. ते अगदी उगवत्या सुर्याप्रमाणे, बाळाच्या निर्मळ हास्याप्रमाणे पवित्र आहे. 

व्हायरल होतोय हा व्हिडिओ

प्रेमाची सुरूवात ही नजरेने होतं असं म्हणतात. तुमचं प्रेम हे पहिले तुमचे डोळेच व्यक्त करत असतात. असाच डोळ्यातून व्यक्त होणारं हे अनोख प्रेम सध्या सोशल मीडियावर भरपूर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमुळे प्रत्येकजण त्याच्या शाळेच्या दिवसांत रमला असेल यात शंका नाही. 

अनेकदा शब्द जिथे कमी पडतील तिथे ही नजरेची भाषा बोलकी ठरते. असाच हा बोलका व्हिडिओ सध्या नेटीझन्सच्या पसंतीला पडत आहे. हा व्हिडिओ व्हॅलेंटाईन विकमध्ये व्हायरल झाल्यामुळे याला अधिक पसंती मिळत आहे. या व्हिडिओतील कादील अदा सगळ्यांनाच घायाळ करत आहे. 

हा व्हिडिओ नेमका कुठचा, कुणी रेकॉर्ड केला किंवा कुणाचा आहे याबाबत झी चोवीस डॉट कॉमकडे अद्याप कोणतीही माहिती नाही.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x