Viral Video : एक विवाह असा पण! या लग्नसोहळ्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Sheru Weds Sweety : तर हा लग्नसोहळा आहे स्वीटी आणि शेरूचं...कोण आहेत हे स्वीटी शेरू तर हे आहेत ...  

Updated: Nov 16, 2022, 04:35 PM IST

Dog_Wedding

Dog Wedding : तुम्ही लहानपणी कधी बाहुला-बाहुलीचं लग्न (marriage) लावलं का? शिवाय आपल्या बालपणी एका मुलीला नवरी बनवायचं आणि एका मुलाला नवरदेव...बाकी सगळे चिल्लेपिल्ले वराती...आणि मग काय मोठ्या धुमधडाक्यात हा सोहळा रंगायचा...लग्नाचे विधी लग्न सोहळा याबद्दल लहानपणी खूप कौतुक होतं. बॉलिवूडमध्ये आपण लग्न विधीशी जुळलेले अनेक चित्रपट पाहिले आहेत. हम साथ साथ है (Hum Saath Saath Hai), हम आपके है कोन (Hum apke hai koan) आणि एक विवाह ऐसा भी (Ek Vivaah Aisa Bhi), विवाह असे अनेक चित्रपट...पण हा झाला चित्रपटाचा विषय, खऱ्याखुऱ्या आयुष्यात असाच एक अनोखा विवाहसोहळा पाहिला मिळाला...

स्वीटीच्या लग्नाला यायचं हं!

तर हा लग्नसोहळा आहे स्वीटी आणि शेरूचं...कोण आहेत हे स्वीटी शेरू तर हे आहेत पाळीव श्वान...काय हो...अगदी बरोबर...या दोघांचा विवाहसोहळा मोठ्या थाट्यात माट्यात साजरा झाला. लग्न समारंभाचा एक व्हिडिओही ऑनलाइन समोर आला असून तो प्रचंड व्हायरल होत (Video viral on Social media) आहे. या विवाह सोहळ्याला 'ढोल'च्या साथीने लोक कुत्र्याच्या लग्नात पूर्ण उत्साहात नाचले. पाळीव प्राण्यांच्या मालकांनी त्यांच्या शेजाऱ्यांना 'बाराटी' म्हणून लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी 100 निमंत्रण पत्रिका पाठवल्या. (Video Dog Wedding Sheru Weds Sweety viral on Social media nmp)

अनोख्या लग्नामागे इमोशनल कहाणी

झालं असं की स्वीटी या पाळीव श्वानची मालकीण हिला मुलंबाळ नाही. त्यामुळे ती या श्वानलाच आपली मुलगी मानते. तिच्यासोबत खेळणं,तिचं खाणंपिणं अगदी तिचं सगळं करण्यातच त्यांना आनंद मिळतो. तर शेरूच्या मालकीणबाईचीही अशीच काही, ती म्हणते की, शेरू माझ्या मुलगा आहे. 8 वर्षांपासून तो आमच्या घरातील एक सदस्य आहे. एकदा असाच लग्नाचा विषय निघाला आणि मग गंमतीत स्वीटी आणि शेरूचं लग्नच ठरवलं आम्ही...

मग काय लागलो काम आणि उडवून दिला बार...या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरीची पाठवणी करताना अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. हा विवाहसोहळा हरियाणामधील गुरुग्रामच्या एका छोट्याशा गावात झाला आहे.