पंखा नव्हे काळ; मायलेकीच्या डोक्यावर मृत्यूची हवा, पुढे जे झालं ते....

 दैव बलवत्तर कशाला म्हणतात हे तुम्हाला हा धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यावर कळेल. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसतो.

Updated: Apr 4, 2022, 11:07 AM IST
पंखा नव्हे काळ; मायलेकीच्या डोक्यावर मृत्यूची हवा, पुढे जे झालं ते....  title=

Viral Video: दैव बलवत्तर कशाला म्हणतात हे तुम्हाला हा धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यावर कळेल. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसतो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका कुटुंबावर कसा मृत्यू ओढावतो. परंतू त्यातून ते अलगद वाचतात. या भयानक घटनेनंतर कुटूंबियांपैकी कोणालाही साधे खरचटत देखील नाही. ही घटना आपल्या सर्वांशी निगडीत आहे. कारण आपण प्रत्येकजण सिलींगला लावलेल्या पंख्याखाली झोपतो.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कुटुंब एका छोट्याशा दुकानात बसलेले दिसत आहे. लहान मुलगी, तिची आई आणि कुटुंबातील काही सदस्य सोबतच आहेत. अचानक सिलिंगवरून तुटूत पंखा जमिनीवर पडला. वेगाने फिरणारा पंखा तुटल्याने कुटूंबियांनी आपले प्राण वाचवत तेथून तातडीने बाहेर पडले. 

छताचा पंख्याकडे कोणाचेही लक्ष नसते. शेवटच्या क्षणी मुलीची नजर पंख्याकडे जाते आणि मग काहीतरी बोलते. तेव्हा जवळून चालणाऱ्या महिलेची नजर त्या तुटणाऱ्या पंख्यावर पडते.

सीसीटीव्ही फुटेज पाहून तुम्हाला बसेल धक्का

पंखा पडणार असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात येताच, सर्वांनी पळ काढला आणि पंखा छतापासून अलग होऊन जमिनीवर पडला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर  only._.sarcasm_ या नावाने हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.  त्यावर अनेक युजर्सने कमेंट केल्या आहेत.