याला दिवाळीत फटाक्यांसोबत स्टंट करणं पडलं महागात, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, "याचा खेळा..."

देशात फटाके फोडण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी, काही हौशी लोकांनी सालाबादप्रमाणे फटाके फोडून आपली दिवाळी साजरी केली.

Updated: Nov 7, 2021, 08:31 PM IST
याला दिवाळीत फटाक्यांसोबत स्टंट करणं पडलं महागात, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, "याचा खेळा..." title=

मुंबई : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळीत अनेकांनी फटाकेही फोडले. तसे पाहाता देशात फटाके फोडण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी, काही हौशी लोकांनी सालाबादप्रमाणे फटाके फोडून आपली दिवाळी साजरी केली. परंतु तुम्ही फटाके फोडताना असे काही अतरंगी लोकं पाहिले असतील जे स्टंट करत फटाके फोडतात. ज्याचा दुसऱ्या लोकांना त्रास होतो. तर काही वेळा या स्टंट करणाऱ्या लोकांचे स्वत:चे देखील नुकसान होते.

सध्या अशाच एका व्यक्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो फटाक्यांसोबत स्टंट करताना दिसत आहे. याचा परिणाम काय होतो, हे तुम्हीच व्हिडीओमध्ये पाहा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही लोकं रस्त्याच्या मधोमध फटाके वाजवून मजा घेत आहेत. पण या सगळ्यात एका माणसाच्या अप्रतिम स्टाइलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

वास्तविक, या व्यक्तीने हेल्मेट घातले आहे. ज्यावर त्याने चक्र बसवला आहे. त्यानंतर हा व्यक्ती तो चक्र पेटवतो. त्यानंतर जे काही घडते ते थक्क करणारे आहे.

चक्राला आग लावताच ती व्यक्ती इकडे तिकडे चालायला लागते आणि मग जमिनीवर झोपते. यानंतर, काही सेकंदांसाठी, या व्यक्तीचे डोके आगीच्या बॉलमध्ये बदलते. व्हिडीओमधला हा सगळा प्रकार पाहणे मजेदार वाटेल, पण ज्याने हा स्टंट केला असेल त्या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल याचा विचार करा!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओपाहून सोशल मीडियावर काही लोकं त्याच्या या स्टंट आणि धाडसाचे कौतुक करत आहेत, तर काही लोक याला निव्वळ वेडेपणा म्हणत आहेत. आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी असा जिवघेणा स्टंट करणे हे मूर्खपणाचे असल्याचे ही लोकं सांगत आहेत. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट केल्या आहेत.