सासूने सुनेला जमिनीवर आदळत केली मारहाण, किचनमध्येच तुंबळ हाणामारी; मुलाने काढला VIDEO

Viral Video: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या महिला सासू आणि सून असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

शिवराज यादव | Updated: Jul 27, 2023, 07:51 PM IST
सासूने सुनेला जमिनीवर आदळत केली मारहाण, किचनमध्येच तुंबळ हाणामारी; मुलाने काढला VIDEO title=

Viral Video: प्रदेशात (Uttar Pradesh) दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अलीगढमधील आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या महिला सासू आणि सून असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे मुलानेच हा व्हिडीओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. दरम्यान दोघींपैकी एकीनेही याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीच सासू आणि सासऱ्यांविरोधात कलम 151 अंतर्गत शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, डोरी नगर भागात  भूप प्रकास आपली पत्नी, मुलगा आणि सूनेसह राहतात. काही वर्षांपूर्वी मुलाचं लग्न झालं होतं. त्यांना तीन मुली आहेत. दरम्यान, मुलाकडे कोणताही स्थायी नोकरी नाही. यामुळेच त्यांच्यात सतत भांडण होत होतं. 

मुली झाल्याने सासू त्रास देत असल्याचा सासूचा आरोप

सूनेने आधी मारहाण करण्यास सुरुवात केली असा सासूचा आरोप आहे. त्यामुळेच सासूने तिला मारहाण केली. विशेष म्हणजे मुलानेच कॅमेऱ्यात हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. सासू आणि सून नेहमी एकमेकींवर काही ना काही आरोप करत असतात. सूनेचा आरोप आहे की, तिला तीन मुली असून एकही मुलगा नाही. यामुळेच सासू सतत मला टोमणे मारत असते, भांडत असते. 

पोलिसांनी काय सांगितलं?

गांधी पार्क पोलीस ठाण्याचे एसएचओ रवींद्र कुमार दुबे यांनी सांगितलं आहे की, पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेतली आहे. पोलिसांनी सासू राणीदेवी आणि सासरे भूप सिंह यांच्याविरोधात कलम 151 अंतर्गत कारवाई केली आहे.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात सासू-सूनेने कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. मात्र पोलिसांनीच या प्रकरणाची दखल घेत तक्रार दाखल केली असून प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. हे कुटुंबाचं अंतर्गत प्रकरण आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, याआधीही घरात वाद सुरु होते. मुलाकडे नोकरी नसल्याने कुटुंबात वारंवार भांडणं होत होती. दरम्यान सासू-सासऱ्यांचं म्हणणं आहे की, घर मुलगा किंवा मुलींच्या नावे केलं जावं अशी सूनेची मागणी आहे.