हेच एकीचं बळं; 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल

Team Work Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. हा व्हिडीओ पाहून झाल्यावर एकीचे बळ काय आहे याचा तुम्हाला प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हा व्हिडीओ जर का अद्याप पाहिला नाहीत तर आता तुम्ही तो पाहायलाच हवा.   

गायत्री हसबनीस | Updated: Oct 13, 2023, 04:32 PM IST
हेच एकीचं बळं; 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल  title=
viral video which shows team work and unity netizens reacts

Team Work Video: सध्या अनेक प्रकारचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यात असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर हा व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की एकीचे बळ काय असते ते. खरंतर आपण कायमच असं बोलत असतो की आपल्यात कधीच एकी नसते. त्याचसोबत ही एकी कधी येईल असाही प्रश्न आपल्याला पडतो. त्यात सध्या इस्त्राईल आणि हमास युद्धानं जगभरात थैमान घातला आहे.

सध्या या युद्धानं सगळ्यांची त्रेधातिरपिट झाली आहे. त्यातून हा वाद आता चांगलाच वाढू लागला आहे. अशातच सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यामुळे तुम्हाला ही गोष्ट नक्की जाणवेल की एकीकडे धुमासान युद्धात हा व्हिडीओ आपल्याला किती एकीचे बळ शिकवतो आहे. त्यामुळे सध्या आपल्याला सर्वांना हा व्हिडीओ पाहिला पाहिजे. हा व्हिडीओ आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून जाईल. 

आपल्याला मोठ्या वजनदार गोष्टी या नेणं या फारच कठीण असतं. आपल्याला कधीतरी असं वाटतं की समजा आपल्याला या संपुर्ण वस्तू कुठेतरी उंचावरून घेऊन जायचं असेल तर मात्र आपल्याला बरेच प्रयत्न करावे लागतात. काही लोकांच्या मदतीनं हे वर नेणं शक्यच नाही. त्यामुळे अशावेळी आपल्याला अनेक लोकांची मदत घ्यावी लागते. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यातून आपल्या टीमवर्क दिसले आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतूनही आपल्याला त्याचा प्रयत्न आल्याशिवाय राहणार नाही. सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून आपण पाहू शकतो की एक मोठं मशीन नेण्यासाठी अनेक माणसं ही एकत्र आली आहेत. तेव्हा या सर्व लोकांनी हे मशीन नेण्यासाठी एक खूप मोठ्ठी अशी शिडी बनवली होती आणि मग त्यानंतर हे मशीन त्यानं बांबू आणि दोऱ्या बांधली आणि प्रत्येकानं हे मशीन वर नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : कुणी काम देतं का कामं? 200 चित्रपट करणाऱ्या नटसम्राटाची दयनीय अवस्था

@machines_in_action नावाच्या एका युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 1.3 मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे याची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावर नाना लोकांनी तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं म्हटलं आहे की, 'अशाप्रकारेच पिरॅमिड बनला आहे.' तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे की, 'यालाच टीमवर्क असं म्हणतात.' सध्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नानाविध कमेंट्स केल्या आहेत.