कुणी काम देतं का कामं? 200 चित्रपट करणाऱ्या नटसम्राटाची दयनीय अवस्था

Bollywood Actor Jobless: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे टीकू तलसानिया यांची. सध्या ते कामं करण्यासाठी लढत आहेत. त्यांना फक्त आता कामाची गरज आहे परंतु त्यांना ते मिळतं नाहीये. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 13, 2023, 02:33 PM IST
कुणी काम देतं का कामं? 200 चित्रपट करणाऱ्या नटसम्राटाची दयनीय अवस्था title=
tiku talsania expresses his grief of not getting any work

Tiku Talsania : कलाकारांचे आयुष्य हे तितकेसे सोप्पे नसते. त्यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग हे घडताना दिसतात. पहिल्यांदा कामं मिळणं ही एक कठीण गोष्ट असते तर त्यानंतर आपलं करिअर टिकवणंही फार कठीण असतं. सध्या अशाच एका कलाकारवर तशी वेळ आली आहे असे दिसते आहे. ज्येष्ठ अभिनेते टीकू तलसानिया हे बॉलिवूडमधील एककाळचे फारच लोकप्रिय अभिनेते होते. परंतु आज त्यांना बॉलिवूडमध्ये काम मिळणं फारच मुश्किल झालं आहे. 1990s च्या काळात त्यांचे नावं हे घराघरात लोकप्रिय होते. त्यांनी बीग बी अमिताभ बच्चन  आणि गोविंदा यांच्यासोबतही कामं केली आहेत. परंतु आज त्यांच्याकडे कोणतंच काम नाही. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून याचा खुलासा केला आहे. त्यांनी या मुलाखतीतून एक गोष्ट प्रकर्षानं सांगितली आहे की त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच ऑडिशन दिल्या आहेत. परंतु यावेळी मात्र त्यांना कुठेही कामं मिळणं हे मुश्किल झालं आहे. 

नक्की त्यांनी कोणत्या गोष्टींचा खुलासा केला आहे हे आपण या लेखातून जाणून घेऊया. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की ते आज जॉबलेस आहेत. चांगलं कामं मिळवण्यासाठी ते आजही फार संघर्ष करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत भरपूर ऑडिशन्स दिल्या आहेत परंतु आत्तापर्यंत त्यांना कुठलंच कामं मिळालेलं नाही. ते म्हणाले की, ही इंडस्ट्री फार झपाट्यानं बदलते आहे. ही इंडस्ट्री फारच पुढे जाते आहे त्याचसोबत याच इंडस्ट्रीशी ते समांतर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. 

काम मिळणं का कठीण झालंय? 

टीकू तलसानिया यांनी यावेळी सांगितले की, मी गुजराती आहे. मी गुजराती नाटकांमध्ये खूप कामं केली आहेत. माझं करिअरही नाटकातील आहे. परंतु आज माझ्याकडे कुठलंच काम नाही. मी शोधून शोधून दमलो आहे. 

कोणत्या चित्रपटांतून केली आहेत कामं?

टीकू तलसानिया यांनी 'दिल है कि मानता नहीं', 'इश्क' अशा अनेक चित्रपटांतून कामं केली आहेत. तेव्हा त्यांचे चित्रपट हे एकामागून एक हीट व्हायचे. त्यांनी अनेकदा विनोदी पोलिसवाल्याची भुमिका केली आहे. 69 वर्षीय हे अभिनेते मी रिटायर्ड नाही असं म्हणत आहेत. तर ते कामाच्या शोधात आहेत. त्यांच्याच वयाचे अनिल कपूर, सनी देओल हे आज सुपरहीट झाले आहेत. परंतु आज या नटसम्राटाची अवस्था फारच दयनीय आहे.