विराट कोहली-अनुष्का शर्माला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, 'हे' सेलिब्रेटीही होणार सहभागी

Anushka-Virat Got Ram Mandir Inauguration Invitation : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रण स्विकारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 16, 2024, 07:04 PM IST
विराट कोहली-अनुष्का शर्माला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, 'हे' सेलिब्रेटीही होणार सहभागी title=

Anushka-Virat Got Ram Mandir Inauguration Invitation: अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळणाऱ्या व्हीव्हीआयपींच्या यादीत आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचाही समावेश झाला आहे. विराट-अनुष्काचा निमंत्रण स्विकारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोत अनुष्का शर्माने सफेद रंगाचा अनालकली सूट परिधान केला आहे. तर विराट कोहलीने डेनिम शर्टबरोबर सफेद रंगाची पँट परिधान केली आहे. सोहळ्याचं निमंत्रण (Ram Mandir Inauguration Invitation) स्विकारतर कॅमेरासमोर पोज देताना दोघंही दिसतायत. 

या सेलिब्रेटिंना निमंत्रण 
एक दिवस आधीच म्हणजे सोमवारी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनीलाही निमंत्रण देण्यात आलं होतं. याशिवाय सेलिब्रेटिंच्या यादीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले, बिग अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अक्षय कुमार, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, अजय देवगन या कलाकारांचा समावेश आहे. याशिवाय दक्षिणेतल्याही अनेक स्टार्सने प्राण प्रतिष्ठेचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यात रजनीकांत, चिरंजीवी, यश, मोहनलाल आणि ऋषभ शेट्टी यांचा समावेश आहे. 

23 जानेवारीपासून सामान्यांना दर्शन
राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा मुख्य सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. त्याआधी 16 जानेवारीपासून अयोध्येत विविध कार्यक्रमांना सुरुवात होईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार 23 जानेवारीपासून सामान्य लोकांना रामलल्लाचं दर्शन खुलं होणार आहे. 

प्राण प्रतिष्ठेचं वेळापत्रक
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची पूर्ण माहिती दिली आहे. 22 जानेवारी रोजी कूर्म द्वादशीच्या दिवशी मृगाशिरा नक्षत्रात दुपार 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे या 32 सेकंदाच्या वेळेत मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे.  काळ्या खडकापासून बनवलेली रामललाची मूर्ती 51 इंच उंच आहे. मूर्तीचं वजन 150 ते 200 किलो दरम्यान आहे. ही मूर्ती भगवान रामाच्या 5 वर्षांच्या बालस्वरूपाची आहे, 

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या दिवशी प्रभू श्रीरामाचा पोशाखही खास असणार आहे. याबाबत रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांना नवीन पोशाख आणि ध्वज स्वाधिन करण्यात आला आहे. हा पोशाख राम दल अयोध्येचे अध्यक्ष कल्की राम दास महाराज यांनी अर्पण केला आहे. त्यांनी एक ध्वजही समर्पित केला आहे जो स्थापित केला जाणार आहे. अभिषेक सोहळा आटोपल्यानंतर रामललाला नवीन वस्त्र परिधान केली जातील.