'सॉरी ताई, मला..', WhatsApp मेसेज करुन कॉलेज इमारतीवरुन मारली उडी; बापाला म्हणाली, 'मी आता..'

17 Year Old Girl Jump To Death: आपल्या कौटुंबिक व्हॉट्सअप ग्रुपवर या विद्यार्थीनीने लांबलचक मेसेज पोस्ट केला. यामध्ये तिने वडिलांनी आपण आयुष्य का संपवत आहोत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. थोरल्या आणि धाकट्या बहिणीसाठीही तिने शेवटचा स्पेशल मेसेज लिहिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 31, 2024, 10:12 AM IST
'सॉरी ताई, मला..', WhatsApp मेसेज करुन कॉलेज इमारतीवरुन मारली उडी; बापाला म्हणाली, 'मी आता..' title=
या प्रकरणाता तपास सध्या पोलीस करत आहेत

17 Year Old Girl Jump To Death: विशाखापट्टणममधील एका 17 वर्षीय विद्यार्थीने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येपूर्वी आपल्या कौटुंबिक व्हॉट्सअप ग्रुपवर या मुलीने एक लांबलचक मेसेज पोस्ट केला होता. या मेसेजमध्ये तिने माझा लैंगिक छळ झाला असून मी याबद्दल कॉलेज प्रशासनाकडे तक्रार करु शकत नाही कारण माझा छळ करणाऱ्याने माझे अश्लील फोटो काढले असून ते पोस्ट करण्याची धमकी मला दिली आहे, असंही नमूद केलं आहे. माझ्याबरोबर शिकणाऱ्या इतरही काही विद्यार्थीनींचं लैंगिक शोषण झाल्याचा दावा या तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या मेसेजमध्ये केला आहे. मेसेजमध्ये या विद्यार्थीने तिच्या ताईला उद्देशून, 'सॉरी ताई, मला जावं लागणार आहे' असंही म्हटलं आहे.

व्हॉट्सअप मेसेजवरुन सुसाईड नोट

आत्महत्या केलेली विद्यार्थी विशाखापट्टणममधील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत होती. आंध्र प्रदेशमधील अक्कलपल्ले जिल्ह्यात या विद्यार्थीचे कुंटुंबिय वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री 10 वाजता या विद्यार्थीनीच्या पालकांना कॉलेमधून फोन आला. तुमची मुलगी बेपत्ता आहे असं पालकांना कळवण्यात आलं. त्यानंतर पालकांनी तिला अनेकदा फोन केला मात्र तिने फोन उचलला नाही. अखेर पालकांनी पोलिसांकडे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली. अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर या मुलीने तिच्या कुटुंबियांना व्हॉट्अपवरुन मेसेज करुन मी ठिक आहे आणि तुम्ही काळजी करु नका असं कळवण्यात आलं.

छोट्या बहिणीसाठी खास मेसेज

"फार टेन्शन घेऊ नका आणि माझं नीट ऐका. मी तुम्हाला सगळं काही सांगू शकत नाही की मी निघून चालले आहे. बरं मी सांगितलं तरी तुम्हाला ते समजणार नाही. माझ्याबद्दल तुम्ही साऱ्या गोष्टी विसरुन जा. मी तुमची माफी मागते. आई-बाबा तुम्ही मला जन्म दिला आणि लहानाचं मोठं केलं यासाठी मी तुमची आभारी आहे. माझ्या आयुष्याचा धडा संपत आला आहे," असं या मुलीने कौटुंबिक व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं. आपल्या थोरल्या बहिणीला बाळ होणार असल्याने तिचं अभिनंदही या विद्यार्थिनीने तिच्या मेसेजमध्ये केलं. तर आपल्या धाकट्या बहिणीलाही तिने मेसेजमधून सल्ला दिला. "तुझ्या भविष्याकडे तू लक्ष दे. तुला ज्या विषयाची आवड आहे त्याचं शिक्षण घे. कशाहीमुळे तुझं लक्ष विचलित होऊ देऊ नकोस. माझ्यासारखी इतर गोष्टींपासून प्रभावित होऊ नकोस. कायम आनंदी राहा आणि सुखात जग," असं या विद्यार्थिनीने आपल्या धाकट्या बहिणीला सांगितलं.

मी आता गेले तर...

आपल्या वडिलांना उद्देशून या विद्यार्थीने आपण आत्महत्येचा निर्णय का घेत आहोत हे सांगितलं आहे. माझ्या कॉलेमध्ये माझं लैंगिक शोषण झालं आहे असं तिने तिच्या वडिलांना सांगितलं आहे. "तुम्ही असं विचारु शकता की मी याबद्दल कॉलेज प्रशासनाकडे तक्रार का करत नाही. मात्र तक्रार केली तरी त्याचा फायदा होणार नाही. छळ करणाऱ्याने माझे फोटो काढले असून तो मला ते शेअर करण्याची धमकी देत आहे. असा प्रकार इतर मुलींबरोबरही घडला आहे. आम्ही हे कोणाला सांगूही शकत नाही आणि आम्ही कॉलेजला अनुपस्थितही राहू शकत नाही. आम्ही मधल्यामध्ये अडकले गेलो आहोत. मी पोलिसांकडे तक्रार केली किंवा प्रशासनाकडे तक्रार केली तर माझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जातील. मी आता हा असा जाण्याचा निर्णय घेत आहे कारण आता मी गेले तर तुम्हाला काही वर्ष वाईट वाटेल मात्र नंतर तुम्ही सारं विसरुन जाल. मात्र मी तुमच्या आजूबाजूला असेल तर तुम्हाला माझ्याकडे पाहून सतत वाईट वाटत राहील," अशा शब्दांमध्ये या विद्यार्थिनीने तिच्या वडिलांना शेवटचा मेसेज पाठवला आहे.

मेसेजच्या शेवटी ताईची माफी

मेसेजच्या शेवटी आपल्या गरोदर बहिणीसाठी, "मला माफ कर ताई, मी तुला या तणावात टाकत आहे. पण मला जावं लागणरा आहे," अशी ओळ या विद्यार्थिनीने लिहिली आहे.

कुटुंबाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण

हा मेसेज आल्याआल्या कुटुंबाने पोलिसांना कळवलं. कुटुंबीय या तरुणीला कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नकोस सर्वकाही ठीक होईल असं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस तिच्यापर्यंत पोहोचतील एवढा वेळ घेण्याचा कुटुंबियांचा प्रयत्न होता. मात्र तिने काहीच रिप्लाय केला नाही आणि काही वेळात तिचा मृतदेह सापडला.

माझी मुलगी का मेली कळलं पाहिजे

या विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये, "माझी मुलगी नेमकी का मेली हे मला जाणून घ्यायचे आहे. मी तिला फार प्रेमाने आणि लाडाने लहानाचं मोठं केलं होतं. तिला 10 वीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले होते. तिला चांगलं शिक्षण मिळेल म्हणून या कॉलेजला आम्ही टाकलं होतं," असं म्हटलं आहे.

लैंगिक छळाचा प्रश्नच नाही

कॉलेजच्या मुख्यध्यापकांनी महिलांच्या हॉस्टेलमध्ये पुरुषांना प्रवेश नसल्याचं सांगितलं. "आमचं सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष असतं. पुरुष महिलांच्या हॉस्टेलमध्ये जाऊ शकत नाही. तिथे महिला वॉर्डन आहेत. त्यामुळे लैंगिक छळ होण्याचा काही प्रश्नच नाही," असं मुख्यध्यापक म्हणाले. पोलिसांनी या प्रकरणामध्ये सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची चौकशी सुरु केली आहे.