पश्चिम बंगालमध्ये 15 ठिकाणी सीबीआय-ईडीच्या धाड

कोळसा घोटाळा व पशु तस्करीची चौकशी होणार

Updated: Feb 26, 2021, 01:32 PM IST
पश्चिम बंगालमध्ये 15 ठिकाणी सीबीआय-ईडीच्या धाड title=

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये कोलकातसह 15 ठिकाणी कोळसा घोटाळा व पशु तस्करीची चौकशी होणार आहे. त्यामुळे सीबीआय-ईडी विविध ठिकाणी धाड टाकल्या जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये सुदधा सीआय-ईडीकडून त्या व्यापा-यांना टारगेट केल जात आहे. जे व्यापारी कोऴसा घोटाऴा व पशु तस्करीशी जोडले गेलेत.

पश्चिम बंगालमधील ही ईडीची दुसरी कारवाई असून या पुर्वीच्या कार्यवाही सीबीआय-ईडीला मोठ्या प्रमाणात धागे दोरे हाती लागल्यानेच परत एकदा सीबीआय-ईडीकडून ही कार्यवाही केली जात आहे. सुञाच्या माहितीनुसार दुर्गापुर, कोलकाता, पुरुलियासह 15 विविध ठिकाणी आरोपींना अटक करुन सीबीआय-ईडीच्या धाडी सुरु आहेत.

सीबीआय सुञाच्या माहितीनुसार त्या व्यापा-यांनाकडून कसून चौ्कशी करुन घोटाऴेबाज नेत्य़ांपर्यंत पोहचण्याच प्रयत्न सीबीआय करते आहे. पश्चिम बंगालच्या विविध ठिकाणी या धाडी सुरु आहेत.