अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला? राजीव कुमार यांनी पहिल्यांदा केला खुलासा!

Rajiv Kumar On Arun Goel resignation : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना शनिवारी पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावर उत्तर दिलं. काय म्हणाले पाहा...

सौरभ तळेकर | Updated: Mar 16, 2024, 06:44 PM IST
अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला? राजीव कुमार यांनी पहिल्यांदा केला खुलासा! title=
Rajiv Kumar On Arun Goel resignation

Rajiv Kumar Statement : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून देशात 7 टप्प्यांत निवडणूक (LokSabha Elections 2024 Schedule) होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. त्यावेळी राजीव कुमार यांच्यासह राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार (Gyanesh Kumar) आणि सुखबीरसिंग संधू (Sukhbirsingh Sandhu) देखील उपस्थित होते. निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगात नेमकं चाललंय काय? असा सवाल विचारला जात होता. अशातच आड लोकसभा निवडणुकीची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अरुण गोयल (Arun Goel resignation) यांच्या राजीनाम्यावर मोठं वक्तव्य केलंय.

अरुण गोयल यांनी राजीनामा का दिला?

राजीव कुमार यांना शनिवारी पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारले. तेव्हा राजीव कुमार यांनी प्रतिक्रिया दिली. अरुण गोयल यांच्याकडे राजीनामा देण्याचे वैयक्तिक कारण असेल तर आम्ही त्यांचा आदर केला पाहिजे, असं राजीव कुमार यांनी म्हटलंय. त्यावेळी त्यांनी अरुण गोयल यांचा उल्लेथ प्रतिष्ठीत सदस्य म्हणून केला. तर भारतीय निवडणूक आयोगामध्ये नेहमीच मतभेद असतील, असं वक्तव्य देखील अरुण गोयल यांनी केलं आहे.

देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha polls) तोंडावर असताना निवडणूक आयुक्त असणाऱ्या मोठ्या पदावरील व्यक्तीने तडकाफडकी राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे अरुण गोयल यांनी राजीनामा सोपवला होता. खरं तर राजीनामा हा मुख्य निवडणूक आयुक्तांकडे सोपवण्याची परंपरा असते. परंतू अरुण गोयल यांनी थेट राष्ट्रपतींना राजीनामा सोपवल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. कायदा मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. गोयल यांचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत होता. परंतु तीन वर्षे आधीच त्यांनी हा राजीनामा दिल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. पहिला टप्पा 19 एप्रिलला, 26 एप्रिलला दुसरा टप्पा तर शेवटचा टप्पा 1 जूनला असणार आहे. तर मतमोजणी 4 जूनला होईल. महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.