महिला कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षांची प्रसूती रजा, 'या' कंपनीचा ऐतिहासिक निर्णय

Maternity Leave Policy: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सादर केलेली नवीन प्रसूती पॉलिसी पाच वर्षांसाठी आहे. याअंतर्गत पाच वर्षांची 'करिअर अँड केअर' योजना आणण्यात आली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 3, 2023, 01:34 PM IST
महिला कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षांची प्रसूती रजा, 'या' कंपनीचा ऐतिहासिक निर्णय title=

Maternity Leave Policy: महिलांसाठी प्रसूती रजा ही खूप महत्वाची असते. बाळाच्या जन्मापासून ते संगोपनापर्यंत मातेला सुट्टीची गरज आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये नियमानुसार महिला स्टाफला 6 महिन्यांची प्रसूती रजा दिली जाते. पण दिग्गज वाहन उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) ने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रसूती धोरण आणले आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या या उपक्रमाचे उद्योग जगतात कौतुक होत आहे. काय आहे हे धोरण? याचा महिला कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार? याबद्दल जाणून घेऊया.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सादर केलेली नवीन प्रसूती पॉलिसी पाच वर्षांसाठी आहे. याअंतर्गत पाच वर्षांची 'करिअर अँड केअर' योजना आणण्यात आली आहे. यामध्ये सक्तीच्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. महिंद्रा अँड महिंद्राशी संबंधित सर्व महिला कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे.

नवीन प्रसूती धोरणांतर्गत कव्हरेज 

कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनाही नवीन प्रसूती धोरणांतर्गत संरक्षण देण्यात येणार आहे. ज्या महिला मुले दत्तक घेतात आणि सरोगसीद्वारे माता बनतात त्यांनाही या पॉलिसीमध्ये समाविष्ट केले जाईल, असे सांगण्यात आले. महिंद्रा अँड महिंद्राने पाच वर्षांसाठी प्रसूती रजा धोरणाचा विस्तार केला आहे.

24 महिने हायब्रिड कामाचा पर्याय

नवीन प्रसूती रजा धोरण सर्व नवीन मातांना सहा महिने फ्लेक्झिबल  आणि 24 महिने हायब्रिड कामाचा पर्याय देतात. 26 आठवड्यांची मॅटर्निटी लिव्ह पूर्ण झाल्यानंतर मॅनेजरच्या परवानगीने ही रजा घेता येईल. यासोबतच महिला कर्मचाऱ्यांना एक आठवड्याची आवश्यक प्रसूती रजाही देण्यात येणार आहे. महिंद्रा एंड महिंद्रा ग्रुपच्या ह्यूमन रिसोर्सेज प्रेसिडेंट रुजबेह ईरानी यांनी यासंदर्भात माहिती दिली.आमच्याकडून एक सेट तयार करण्यात आला आहे. त्यात प्रसूती झालेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी  संपूर्ण पाच वर्षांचा प्रवास समाविष्ट आहे. याअंतर्गत प्रसूतीपूर्वी एक वर्ष, आई झाल्यानंतर एक वर्ष आणि आई झाल्यानंतर तीन वर्षांचा कालावधी कव्हर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महिला कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याचा उद्देश

उद्योगात अधिकाधिक महिलांना आकर्षित करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. पुरुषप्रधान क्षेत्रात महिलांचे प्रतिभा कौशल्य आकर्षित करण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत कंपनी करत असल्याचे महिंद्रा अँड महिंद्राच्या डायव्हर्सिटी काऊन्सिलच्या मुख्य ब्रँड ऑफिसर आणि चेअरपर्सन आशा खर्गा यांनी सांगितले. पॉलिसीमध्ये IVF उपचार खर्चावर 75% सवलत, दैनंदिन वाहतूक सुविधा आणि प्रिमियम इकॉनॉमीमध्ये आउटबाउंड प्रवास किंवा गर्भधारणेच्या शेवटच्या तिमाहीत बिझनेस क्लास प्रवासासह एक वर्षाच्या जन्मपूर्व सपोर्टचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.