Yasin Malik Case : फुटिरतावादी नेता यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

दहशतवादी कारवायासाठी टेरर फंडिंगप्रकरणी यासीन मलिकला दोषी ठरवण्यात आलं होतं

Updated: May 25, 2022, 06:25 PM IST
Yasin Malik Case : फुटिरतावादी नेता यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा title=

Yasin Malik convicted in terror funding case: काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिकला (Yasin Malik) जन्मठेपेची (life imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने यासीन मलिकला शिक्षा सुनावली आहे. एनआयएने यासीन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.

दिल्लीच्या NIA विशेष कोर्टाने यासिन मलिकला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर आज शिक्षा सुनावण्यात आली.  दहशतवादी कारवायासाठी टेरर फंडिंगप्रकरणी यासिन मलिकला दोषी ठरवण्यात आलं आहे. आज यासिन मलिकने स्वतःचा युक्तीवाद स्वतःच केला. यासिन मलिक 2019 पासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहे.

यासिन मलिकवर या कलमाखाली आरोप
कलम 16 (दहशतवादी कारवाया)
कलम 17 (दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे)
कलम 18 (दहशतवादी कृत्यासाठी कट रचला)
कलम 20 (दहशतवादी संघटन किंवा संघटनेचा सदस्य बनला)
भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-बी (गुन्हेगारी कट)
आणि १२४-ए (देशद्रोह) अंतर्गत आरोप सिद्ध झाले.

यासिन मलिकनं केलेले गुन्हे
25 जानेवारी 1990 रोजी श्रीनगरमध्ये हवाई दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचा आरोप मलिकवर आहे. यात 40 जण जखमी  तर चार जवान शहीद झाले होते. स्क्वाड्रन लीडर रवी खन्ना हे त्यापैकीच एक.हे सर्वजण विमानतळावर जाण्यासाठी कारची वाट पाहत होते, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. मलिक यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीतही याचा उल्लेख केला होता.

मुख्यमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण
यासिन मलिकचे पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचाही आरोप आहे.जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिच्याही अपहरणाचा आरोप त्याच्यावर आहे.

काश्मिरी पंडितांच्या हत्येचा आरोप
1990 मध्ये काश्मिरी पंडितांची हत्या करून त्यांना कश्मीर सोडण्यास भाग पाडण्यातही यासिनचा हात होता.

कोण आहे यासीन मलिक
यासीन मलिक हा फुटीरतावादी नेता असून तो जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) शी संबंधित आहे. काश्मीरच्या राजकारणात तो नेहमीच सक्रिय राहिला आहे. तरुणांना भडकवण्याचा आणि हातात बंदूक घेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

यासीन मलिकवर अनेक गंभीर आरोप
यासीन मलिकवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, काश्मीरमधील शांतता बिघडवणे यासह अन्य बेकायदेशीर कारवाया केल्याचाही आरोप आहे. यासीन मलिकला 2017 मध्ये काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीतील NIA न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यातही तो दोषी आढळला आहे.