गणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचत होता तरुण; पोलिसांनी व्हिडिओ पाहिला आणि...

गणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचने तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाला  पोलिसांनी अटक केलेय. 

वनिता कांबळे | Updated: Sep 24, 2023, 03:46 PM IST
गणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचत होता तरुण; पोलिसांनी व्हिडिओ पाहिला आणि... title=

Tamil Nadu Crime News : देश भरात गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. देशभरात धुमधडाक्याता बाप्पाचे आगमन झाले. वाजत गाजत लाकड्या बाप्पाची मिरवणुक काढण्यात आली.  तामिळनाडुमध्ये गणपती आगमनाच्या मिरवणुकीत विचित्र प्रकार घडला. गणपती आगमनाच्या मिरवणुकीत एक तरुण बुरखा घालून नाचत होता. बुरखा घालून नाचणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. 

कोण आहे बुरखा घालून नाचणारा तरुण?

तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये हा प्रकार घडला. 21 स्पेंटबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण गणपतीच्या  मिरवणुकीत बुरखा घालून नाचत होता. कालिचूर नावाच्या एका व्यक्तीने विरुथमपट्टू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे, कटपाडी डीएसपी पलानी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने व्हिडिओची पडताळणी करुन तपास सुरू केला आणि बुरखा घालणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. अरुण कुमार असे आरोपी तरुणाचे नाव आहे. अरुण कुमार हा कालिंचूरचा रहिवासी आहे. 

नेमकं काय घडल?

व्हायरल व्हिडिओच्या मदतीने पोलिसांनी  अरुण कुमार याला अटक केली. अरुण कुमार याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गंमत म्हणून हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले. दरम्यान दोन समाजांमध्येतेड निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपीने हे कृत्य केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? याची देखील चौकशी करावी अशी मागणी देखील केली जात आहे.  

65 लाखांच्या नोटांचा वापर करून गणपती बाप्पासाठी आकर्षक सजावट

बंगळुरूत चक्क 65 लाखांच्या नोटांचा वापर करून गणपती बाप्पासाठी आकर्षक सजावट करण्यात आलीये. ही सजावट करण्यासाठी पाचशे, शंभर, पन्नास आणि वीस रूपयांच्या नोटांचा कल्पकतेनं वापर करण्यात आलाय. 

चोरट्य़ानं  गणपतीच्या मूर्तीच्या गळ्यातील हार पळवला

इंदूरमध्ये एका चोरट्य़ानं चक्क गणपतीच्या मूर्तीच्याच गळ्यातील हार पळवण्याचा प्रकार केलाय. इंदूरच्या जयरामपूर कॉलनीत एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणेश मूर्तीला पंचवीस हजार नोटांचा हार परिधान कऱण्यात आला होता. दरम्यान चोराने चोरी करुन पळून जातानाचा प्रकार सीसीटिव्हीत कैद झालाय.