युट्यूबवर या गाण्याचा हंगामा, एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला VIDEO

सोशल मीडियावर एक गाणे जोरदार व्हायरल होत आहे. हिंदी गाण्याने इंटरनेटवर मोठा धुकाकूळ माजवलाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 10, 2018, 11:46 AM IST
युट्यूबवर या गाण्याचा हंगामा, एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला VIDEO title=
(छाया - व्हिडिओ ग्रैब, युट्यूब)

मुंबई : सोशल मीडियावर एक गाणे जोरदार व्हायरल होत आहे. हिंदी गाण्याने इंटरनेटवर मोठा धुकाकूळ माजवलाय. भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता निरहुआ दिनेश लाल यादव याचे हे गाणे आहे. युट्यूबवर त्याचे गाण्याला १ कोटींच्या घरात हिट्स मिळाल्यात. आतापर्यंत १४,७००,२६३ इतक्या लोकांनी हे गाणे पाहिले आहे. यादव याच्यासोबत भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे पाहायला मिळत आहे.  'पुरानी बीवी बंद करा दा मोदीजी' हे गाणे व्हायरल होत आहे.

आणि ती रागावते

आम्रपाली आपल्या पतीबरोबर वाद घालताना दिसत आहे. निरहुआ दारु प्राशन करुन येतो. त्यानंतर त्याची पत्नी त्याच्यावर रागावते. त्यानंतर तिचा पती एकदम गाणे गायला लागतो... तो मोदींच्या फोटोजवळ पडतो...आणि पुढे...

'निरहुआ चलल लंदन'

 त्याच्या भोजपुरी सिनेमाचे नाव आहे  'निरहुआ चलल लंदन', या सिनेमाचा ट्रेलर त्याने युट्यूबवर रिलीज केलाय.