मालवणमध्ये मच्छिमारांना सापडले घबाड, एकाचवेळी दोन टन मासळी जाळ्यात

रापणीच्या सहाय्याऩे मासेमारीला सुरुवात

Updated: Sep 1, 2018, 08:56 PM IST
मालवणमध्ये मच्छिमारांना सापडले घबाड, एकाचवेळी दोन टन मासळी जाळ्यात title=

सिंधुदुर्ग: मालवणच्या किनाऱ्यानजीक मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या हाती मोठे घबाड लागले आहे. काही दिवसांपूर्वी खवळलेला समुद्र शांत आता झाला. नारळी पौर्णिमेनंतर पारंपारिक पद्धतीच्या रापणीच्या सहाय्यानं मासेमारी सुरू झाली आहे. यावेळी मच्छिमारांच्या जाळ्यात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दोन टन मासळी सापडली.

काही दिवसांपूर्वी खवळलेला समुद्र शांत आता झाला. नारळी पौर्णिमेनंतर पारंपारिक पद्धतीच्या रापणीच्या सहाय्याऩे मासेमारीला सुरुवात झाली.

मालवण शहरातील धुरिवाडामधील समुद्रात स्थानिक मच्छिमारांनी ओढलेल्या रापण जाळ्यात हे खवळा मासे मिळालेत. मोठ्या प्रमाणात मिळालेल्या हा 'खवळा' मासा खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. बाजारपेठेमध्ये इतर माशांच्या तुलनेत 'खवळा' माशांना कमी दर मिळतो. मात्र, मोठ्या प्रमाणात मिळालेला हा मासा खरेदी करण्यासाठी व्यापारी पुढे आल्यामुळे मच्छिमार निश्चिंत झाले आहेत.