Health Tips : तुम्हीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल चेक करता का? वेळीच ही सवय बदला अन्यथा...

Mobile phone use in morning : सकाळी जाग आली की पहिले अंथरुणात मोबाईल शोधत असतो. मोबाईल पाहिल्याशिवाय आपली सकाळ होणे अशक्य... पण सकाळी उठल्या मोबाईल वापरणे हे किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीय का? 

श्वेता चव्हाण | Updated: Jan 4, 2024, 03:16 PM IST
Health Tips : तुम्हीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल चेक करता का? वेळीच ही सवय बदला अन्यथा... title=

Side Effects Of Using Smartphones : आजकाल मोबाईल हा जीवनाचा अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. मोबाईल जवळ नसेल तर आपण सैरवैर होऊ लागतो. आपली सर्व कामे ही मोबाईलवरच अवलंबून असतात. म्हणून मोबाईल वापरणारे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना पहिले मोबाईल बघणार. इतकचं नाही तर जेवताना, झोपताना, अंघोळ करताना, फिरताना मोबाईल ही लोकांची गरज बनली आहे. म्हणूनच बहुतेक लोक मानसिक आरोग्याबद्दल चिंतित असतात. बरेच लोक सकाळी उठल्यावर बहुतेक वेळा त्यांचा मोबाईल तपास असतात. तुम्हाला ही सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण असे वागणे आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. 

मोबाइलमुळे रोजच्या जीवनातील कामे जितके सोपे झाले आहेत, तेवढेच मोबाइलमुळे आरोग्याच्या काही समस्याही वाढल्या आहेत. मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहणे, गेम्स खेळणे, सोशल मीडिया तपासणे, गाणी ऐकणे अशा अनेक गोष्टींसाठी मोबाईल फोनचा सतत वापर केला जातो. ज्या लोकांना सकाळी उठल्या उठल्या फोन तपासण्याची सवय असते,  ते  त्यांचा फोन उशीजवळ ठेवून झोपतात. ज्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. दरम्यान मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे कॅन्सर, ट्यूमरसारखे जीवघेणे आजार होण्याची शक्यता वाढते. तुम्ही सकाळी उठून तुमचा मोबाईल फोन तपासता तेव्हा कोणत्या गोष्टी घडू शकतात ते जाणून घ्या... 

झोपेवर परिणाम

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु जे लोक सकाळच्या वेळेस त्यांचे फोन तपासतात त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होतात. खरं तर, फोन स्क्रीनमधून बाहेर पडणारे किरण मेलाटोनिन हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये व्यत्यय आणतात. हा हार्मोन झोपेचे नियमन करण्यास मदत करतो. 

ताण वाढू शकतो

सकाळच्या वेळे मोबाईल फोन तपासताना अनेकदा नोटिफिकेशन्स, ईमेल्स किंवा सोशल मीडिया अपडेट्समुळे अनावश्यक ताणतणाव येत असतो. अशा परिस्थितीत तुमची नकारात्मकता वाढू शकते आणि त्यामुळे तुम्ही विनाकारण अस्वस्थ होऊ शकता. सकाळी झोपेतून उठल्यानंतर मोबाईलकडे पाहिल्याने कार्यक्षमता कमी होऊन दिवसाची सुरुवात बिघडू शकते.यामुळे तुमचा मूडही खराब होऊ शकतो आणि नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. ज्याचा तुमच्या एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. 

एकाग्रतेचा अभाव

सकाळी उठल्यावर तुमचा बहुतांश वेळ तुमचा मोबाईल तपासण्यात आणि घडलेल्या गोष्टींचा विचार करण्यात जातो. ज्यामुळे तुम्हाला आगामी काळात तुमची एकाग्रता कमी होत असल्याचे जाणवते. एकाग्रतेच्या कमतरतेमुळे तुम्ही दिवसभर तुमच्या मनाप्रमाणे काम करु शकत नाही, जसे की ड्रायव्हिंगपासून ऑफिसमध्ये काम करण्यापर्यंतच्या कामांमध्ये तुम्हाला एकाग्रतेचा अभाव जाणवतो.

डोके आणि मान दुखणे

मोबाईल फोनचा जास्त वापर करणे आणि बराच वेळ एकाच स्थितीत बसून काम करणे. त्यामुळे डोके आणि मान दुखण्याची शक्यता वाढते. 20 ते 40 वयोगटातील लोकांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. 

या उपायांचे पालन करा

1.रात्री झोपताना तुमचा मोबाईल बेडरूमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करा.

2. नाश्ता करताना मोबाईल अजिबात वापरू नका.

3. फोन आणि इंटरनेट बंद करून रात्री झोपा.

4. सकाळी सर्वात आधी मोबाईल इंटरनेट वापरणे टाळा.