धक्कादायक! नाकात हरभरा अडकल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

काही दिवसांपूर्वीच १० रूपयांचे नाणे गिळल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटल्यानंतर पुन्हा नाशिक शहरात पुन्हा एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Updated: Feb 16, 2018, 08:40 PM IST
धक्कादायक! नाकात हरभरा अडकल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू title=

नाशिक : काही दिवसांपूर्वीच १० रूपयांचे नाणे गिळल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटल्यानंतर पुन्हा नाशिक शहरात पुन्हा एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

सिडको परिसरातील ही धक्कादायक घटना घडली आहे. दीड वर्षाच्या मुलाच्या नाकात हरभरा अडकल्याने श्वास कोंडला गेला. आणि त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सुजय बिजूटकर असे मृत मुलाचे नाव आहे. 

खेळतांना तोंडात असलेला हरभऱ्याचा दाणा श्वासनलिकेत गेला आणि श्वास कोंडला. मात्र ते काढण्यासाठी घरच्या घरी प्रयत्न करण्यात आला आणि अगदी शेवटच्या क्षणी श्वास कोंडल्यामुळे त्त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचारापूर्वीच मृत असल्याचं समजताच डॉक्टरांनी त्याला घरी पाठवलं.

अवघ्या दोन दिवसांपूर्वी सुजयचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्याच्या वाढदिवसाच्या आनंदाच्या आठवणी ताज्या असतांनाच अवघ्या दोन दिवसांतच सुजयचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळं बिजूटकर कुटुंबियांवर मोठी शोककळा पसरलीय.