मुंबई, पुणेकरांचा प्रवास होणार जलद? महाराष्ट्रासह देशाला मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, कुठं धावणार हायस्पीड ट्रेन?

Vande Bharat Express : देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्यातच आता केंद्र सरकार वंदे भारत ट्रेन अधिकाधिक मार्गांवर सुरू करण्याची तयारी करत आहे.

श्वेता चव्हाण | Updated: Mar 10, 2024, 03:44 PM IST
मुंबई, पुणेकरांचा प्रवास होणार जलद? महाराष्ट्रासह देशाला मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, कुठं धावणार हायस्पीड ट्रेन?  title=

Vande Bharat Train News In Marathi : देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. देशाची आर्थिक राजधानी देशासह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्यात येणार आहे.  या ट्रेनमुळे मुंबईकर आणि पुणेकरांचा प्रवास जलद होणार आहे.  

गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेचा विकास झपाट्याने झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही एकमेव सेमी हायस्पीड ट्रेन आहे जी प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. भारताचे रेल्वेचे जाळे विस्तारत आहे. वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रातील काही मार्गांवर धावते. सध्या देशांत 82 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. वर्षभरात यात आणखी वाढ होईल. याचदरम्यान राज्यात मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-गोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहे. आता देशात आणखी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहेत. या दोन एक्स्प्रेस महाराष्ट्रातून सुरू होणार असून येत्या 12 मार्च ला राज्याला या दोन गाड्या मिळणार आहेत.   

तसेच पुणे शहरात दुसरी नवीन वंदे भारत रेल्वे सुरू होत आहे. नवी रेल्वे गाड्यांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. पुणे-बडोदा आणि पुणे-सिकंदराबाद या दोन नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. 12 मार्च रोजी पुण्यासह देशाला नवीन 10 वंदे भारत रेल्वे एक्सप्रेस मिळणार आहेत.  

आणखी दोन गाड्या मिळण्याची शक्यता

 महाराष्ट्रातून शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहे. आता पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव या दोन वंदे भारत एक्स्प्रेस येत आहेत. सध्या, रेल्वे मंत्रालय मे 2024 पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या 30 ते 35 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याची योजना आखत आहे. यामध्ये गजानन महाराजांच्या श्रीक्षेत्र शेगावचाही यात समावेश आहे. दरम्यान, जळगाव आणि भुसावळ हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन पॉइंट आहेत. या एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे 'वंद भारत ट्रेन' ला किंवा दोन्ही स्थानकांवर थांबा मिळण्याची ही शक्यता आहे. 

महाराष्ट्रात या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस?

महाराष्ट्रात एकूण 6 वंदे भारत एक्सप्रेस धावतात. आता ही संख्या वाढून 8 इतकी होणार आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेस मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील गांधीनगर, सीएमटी ते शासकीय मडगाव, सीएमटी ते शिर्डी आणि सीएमटी ते सोलापूर या मार्गासह सीएमटी ते जालना या मार्गावर धावते. तसेच वंदे भारत एक्सप्रेस मध्य प्रदेशातील बिलासपूर ते नागपूर दरम्यान धावते.