२ वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला, शोधकार्य सुरू

शोधकार्य युद्धपातळीवर सुरू   

Updated: Feb 13, 2020, 12:07 PM IST
२ वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला, शोधकार्य सुरू  title=

पुणे : २ वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचं नाव संस्कार साबळे असं आहे. पुण्याच्या दत्तवाडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेची बातमी कळताच मुलाचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली आहे. 

संस्कार तेथील एका कठड्यावर खेळत होता पण तो कठडा सुरक्षित नसल्यामुळे मुलाचा तोल गेल्याने तो वाहून गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय तो कठाडा देखील कोसळला आहे. सकाळपासून पुण्यात दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे. 

पेस्ट कंट्रोलनंतर काळजी न घेतल्यामुळे एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.पेस्ट कंट्रोलनंतर दारं-खिडक्या बंद करुन घरात बसल्यामुळे दोघांचा मृत्यू  झाला. अविनाश आणि अपर्णा मजली असं या दाम्पत्याचं नाव असून बुधवारी संध्याकाळची ही घटना आहे. ६४ वर्षीय अविनाश सदाशिव मजली आणि त्यांची ५४ वर्षीय पत्नी अपर्णा अविनाश मजली यांचा मृत्यू झाला.

पुण्यातील बिबवेवाडीनगरातील गणेश विहार सोसायटीत हा प्रकार घडला. बुधवारी संध्याकाळी पेस्ट कंट्रोल केल्यानंतर या दाम्पत्याने काही काळ बाहेर थांबणं गरजेचं होतं. असं न करता या दाम्पत्याने घरात राहण्याचा निर्णय घेतला. यामुळेच या दोघांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.