रायगडावर आज ३४४ वा शिवराज्याभिषेक सोहळा

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज ३४४ वा  शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे . या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त रायगडवर काल पासूनच दाखल झाले आहेत.

Updated: Jun 6, 2017, 10:45 AM IST
रायगडावर आज ३४४ वा शिवराज्याभिषेक सोहळा title=

रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज ३४४ वा  शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे . या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त रायगडवर काल पासूनच दाखल झाले आहेत.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्यावतीने कोल्हापूरचे युवराज संभाजी राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. नगारखान्याजवळ भगवा ध्वज फडकावून शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यास सुरूवात होईल. महाराजांच्या मुर्तीवर सुवर्णनाण्यांचा अभिषेक केला जाणार आहेत. रणवाद्य,हलगी, धुमक, कैताळाच्या कडकडाटात होळीच्या माळावर शिवकालीन युध्दकलेची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. राजदरबारात मुख्य कार्यक्रम होणार आहे. सकाळपासून सासनकाठीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली असून राजदरबार ते शिवसामाधी असा भव्य पालखी सोहळा होईल शिवछत्रपतींच्या प्रतिमेची शोभा यात्रा ही  काढण्यात येणार आहे.