'नो पार्किंग' झोनमध्ये एका दिवसात ८ लाखांची दंड वसूली

नाशिक शहरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महापालिका प्रशासन शहरात वाहनतळ उभारत नाही... आणि रस्त्यावर वाहनं उभी केलीत तर पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. नागरिकांचा दोष नसताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यान नागरिक मेटाकुटीला आलेत.

Updated: Jul 14, 2017, 11:37 PM IST
'नो पार्किंग' झोनमध्ये एका दिवसात ८ लाखांची दंड वसूली title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया नाशिक : नाशिक शहरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महापालिका प्रशासन शहरात वाहनतळ उभारत नाही... आणि रस्त्यावर वाहनं उभी केलीत तर पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. नागरिकांचा दोष नसताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यान नागरिक मेटाकुटीला आलेत.

नाशिक शहरातील महात्मा गांधी रोड मेन रोडसह वर्दळीच्या भागात रस्त्यावर चारचाकी गाड्या पार्क करणाऱ्या गाड्यांचा जामर बसवलं जातंय... तर दुचाकी वाहन टोइंग केले जातेय. पोलिसांच्या या कारवाईचे स्वगत होत असले तरीही आधी पार्किंग ची सुविधा उपलब्ध करून द्या  नंतर कारवाई करा अशी मागणी नाशिककाराकडून केली जातेय. शहराच्या मध्यवस्तीत वाहने उभे करण्यसाठी महापालिकेचे वाहनतळ नाही. व्यापारी संकुल व्यवसायिक पार्किंगची जागा हडप करत असून त्यांच्यावर कुठल्याही स्वरुपाची कारवाई केली जात नाही आणि वाहनचालकांना प्रत्येक वेळी वेठीस का धरले जाते? असा सवाल नाशिककर उपस्थित करत आहेत.

नागरिकांच्या तक्रारीची पोलिसांकडून फारशी दखल घेतली जात नाही. बेशिस्त वाहन चालविणे आणि रस्त्यात गाडी उभी करणे अशा लोकांवर कारवाई यापुढेही सुरु ठेवण्याचा इशारा पोलिसांकडून दिला जातोय. तर महापालिका प्रशानान गेल्या अनेक वर्षाचे मल्टी पार्किंग उभे करण्याचे दावे करतंय.

बुधवारी एका दिवसात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून ८ लाख रुपयाचं दंड वसूल करण्यात आलाय. त्यामुळे या टार्गेट पूर्ण करण्याकडे पोलीसांच लक्ष लागलय तर महापालिका अधिकारी आणि  पदाधिकार्यांना हलगर्जीपणाची सवय लागल्याने नाशिकारांचा कोणीच वाली उरला