viral video: OMG फिल्मी स्टाईलमध्ये 13 फूटाच्या Anaconda ला गावकऱ्यांनी काढलं बाहेर!

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील डोंगरी येथे आढळलेल्या 13 फूट अजगराला जीवनदान मिळालंय.

Updated: Nov 8, 2022, 10:08 AM IST
viral video: OMG फिल्मी स्टाईलमध्ये 13 फूटाच्या Anaconda ला गावकऱ्यांनी काढलं बाहेर! title=

अमर काणे, झी मीडिया, रामटेक: आजकाल सापाचे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. त्यातून महाराष्ट्रातही (Snakes in Maharashtra) असे अनेक व्हिडीओ तयार केले जातात आणि व्हायरल होतात. सोशल मीडियावर अशा व्हिडीओजना खूप पसंती मिळते. सर्पमित्र अनेकदा एकत्र जमतात आणि सामान्यांसाठी सापांबद्दल कायमच चांगली माहिती देत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ (Video) पाहून तुम्हाला परत माणूस आणि प्राण्याच्या (Maharashtra News) नात्याबद्दल पुन्हा एकदा विश्वास बसेल. सध्या रामटेक येथे एक 13 फूटांचा अजगर सापडला आहे. (a python found in ramtek gaon people rescue him from the village)

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील डोंगरी येथे आढळलेल्या 13 फूट अजगराला जीवनदान मिळालंय. वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनाइजेशन सर्पमित्र व प्राणीमित्र या संस्थेच्या सदस्यांनी या 13 फूट लांबीच्या अजगराला त्याच्या अधिवासात सोडले .रामटेक जवळील डोंगरी येथील सुनील नागपुरे शेतात धान कापत असतांना त्यांच्या पायाजवळ एक मोठा अजगर साप आढळून आला. शेतात इतका मोठा साप दिसल्याने शेतात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. 

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

तातडीने वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन (Wild Challenger Orgnisation) रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्राचे सदस्यांना तिथे बोलविण्यात आले. त्यांनी लोकांना दूर करूत सावधतेने 13 फुटांच्या मोठ्या अजगरला कोणत्याही पद्धतीची इजा न होऊ देता सुखरूप रित्या पकडले.त्यानंतर वन विभागाकडे सुपूर्द करत त्यानंतर त्या अजगराला पुन्हा त्याच्या अधिवासात सोडण्यात आल.

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही ग्रामस्थ 13 फूटांचा अजगर घेत शेतातून जाताना दिसत आहेत. त्यामुळे या अजगराची लांबी तुमच्या लक्षात येईल. या व्हिडीओतले ग्रामस्थ हळूहळू पुढे जात या अजगराला काळजीपुर्वक पद्धतीने घेऊन जात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारे एक हास्य आहे. या अजगराचे तोंड पुढे असून त्यांची लांबलचक शेपटी ही पुढे आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पाहून चक्रवाल.